घरमहाराष्ट्रगेलेल्या प्रकल्पांची माजी मुख्यन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा, शेलारांचं ठाकरे पिता-पुत्रांना आव्हान

गेलेल्या प्रकल्पांची माजी मुख्यन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा, शेलारांचं ठाकरे पिता-पुत्रांना आव्हान

Subscribe

मुंबई – राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांवरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. प्रत्येकजण आपली बाजू मांडण्याकरता पत्रकार परिषद घेत आहेत. आता आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे पिता-पुत्राला थेट आव्हान दिलं आहे. अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात किती प्रस्ताव आले, किती कोटीचे आले, कुठ-कठल्या टप्प्यावर होते, किती प्रत्यक्षात सुरू झाले, ते का सुरू नाही झाले, या सगळ्याची माजी मुख्य न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

हेही वाचा – फडणवीस पत्रकार परिषदेत खोटं बोलले, सर्व कामांचे क्रेडिट घेतले; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

- Advertisement -

ठाकरेंनी चालवलेलं सरकार आणि आदित्यजींनी मांडलेल्या भूमिका यांचं वर्णन अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र असंच करता येईल. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री कोणाशी बोलले नाही, भेटले नाही, पत्रकार परिषदा घेतल्या नाहीत. त्यामुळे ते अहंकारी आहेत. आणि आदित्यजी एकदा डाओसला जाऊन आले, हाजीहाजी करणारे त्यांच्यासोबत आहेतच. त्यामुळे ते विलासी राजपूत्र आहेत, असाही टोला आशिष शेलारांनी लगावला.

हेही वाचा – इलेक्ट्रॉनिक क्लस्टरनंतर राज्यात टेक्सटाईल पार्क उभारणार, फडणवीसांनी दिली इनसाइड माहिती

- Advertisement -

मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून चौकशी करावी. एका महिन्यात समितीचा अहवाल यावा. शिवसेनेने याला समर्थन दिलं नाही तर माझं पुन्हा एकदा खरं ठरेल चोर मचाए शोर. भाजप म्हणून माझा आरोप म्हणता ना एएमयु केला म्हणता मग प्रत्यक्षात प्रकल्प का सुरू झाला नाही. प्रकल्प सुरू व्हायला वेळ का लागला. दिरंगाई का झाली? उद्योजगातल्या उद्योगकांशी वाटाघाटी करत होतात का? की टक्केवारीची भाषा चालली होती का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -