घरमहाराष्ट्रसंदीप देशपांडे हल्लाप्रकरणी तपासाला वेग, दोघेजण ताब्यात; विशेष पथकाचीही नेमणूक

संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी तपासाला वेग, दोघेजण ताब्यात; विशेष पथकाचीही नेमणूक

Subscribe

Attack On Sandeep Deshpande | तसंच, आज दुपारी बारा वाजता संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे. 

Attack On Sandeep Deshpande | मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी वॉकदरम्यान शिवाजी पार्कात प्राणघातक हल्ला झाला. मास्कधारी चारजणांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याचा प्रतिकार केला त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भांडूपमधून दोघांना ताब्यात घेतलं आहे. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली आहे. तसंच, आज दुपारी बारा वाजता संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे.

संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शिवाजी पार्क भागातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन संशयितांचे चेहरे समोर आले आहेत. यातील दोघांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला आहे तर एक विना मास्क असल्याचं समोर आलं आहे. यापैकी आज दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

- Advertisement -

देशपांडेंवर मॉर्निंग वॉकला गेले असताना हल्ला

मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले. यावेळी मागून आलेल्या तीन-चार जणांनी त्यांना स्टंप आणि बॅटने मारहाण केली. यात देशपांडे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या हल्ला प्रकरणी देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तीन ते चार अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर हे २५ ते ३० वयोगटातील होते. यातील एक मजबूत बांध्याचा तर दोघे सडपातळ बांध्याचे असल्याचे देशपांडे यांनी पोलिसांना सांगितले. देशपांडे यांनी केलेल्या वर्णनानुसार दादर पोलिसांनी दिवसभरात शिवाजी पार्क परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहिले त्यात देशपांडे यांनी वर्णन केल्यानुसार तीन संशयित आढळले आहेत. या तिघांचा पोलिस आता कसून शोध घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : आपल्या खंद्या समर्थकावर हल्ला झाल्याचं कळताच राज ठाकरे भेटीला आले अन्…

काय आहे एफआयआरमध्ये

देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क गेट क्रमांक ५ जवळ कोणीतरी त्यांच्या उजव्या पायावर टणक वस्तूने जोरात फटका मारला. देशपांडे यांनी मागे वळून पाहिले असता तीन ते चार तरुण होते. त्यांच्या हातात स्टंप आणि बॅट होती. त्यांनी शिव्यांची लाखोली वाहात मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘पत्र लिहितोस का भXX? ठाकरेंना नडतोस का? वरुणला नडतोस का?’ असे बोलून त्यांनी मारहाण केल्याचं देशपांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. हल्लेखोर हे २५ ते ३० वयोगटातील होते. दोघांनी टी-शर्ट आणि बर्मुडा पँट घातलेली होती. तर तिसरा काळ्या रंगाचा शर्ट आणि जिन्स पँटमध्ये होता. असे हल्लेखोरांचे वर्णन देशपांडे यांनी केले आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांना पुन्हा पाहिल्यास ओळखेन असंही देशपांडे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “आम्ही कुणाला भीक घालत नाही…”, मनसे नेते संदीप देशपांडेंचा हल्लेखोरांना इशारा

एफआयआरमध्ये ठाकरे, वरुणचे नाव!

संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी ठाकरेंना, वरुणला नडतोस असा उल्लेख केला आहे. यामुळे देशपांडेंचा अंगुलीनिर्देश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्याकडे आहे. या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी, ‘मुंबईत कोणावर हल्ला झाला असेल आणि तो राजकीय कार्यकर्ता असेल तर याची पोलिसांनी दखल घेतली पाहिजे. आमची नावे घेऊन काय होणार? दोन दिवस पेपरमध्ये नाव येईल याशिवाय काही होणार नाही. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे.’ असे म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -