घरताज्या घडामोडीराज्यपालांवर अदृश्य दबाव : भुजबळ

राज्यपालांवर अदृश्य दबाव : भुजबळ

Subscribe

आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राउत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दबाव असल्याचा आरोप केला आहे. याबाबत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता, राज्यपालांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील, परंतू त्यांच्यावर अदृश्य दबाव असल्याचा टोला लगावत भुजबळांनी केंद्रावर निशाणा साधला.

बारा आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान राज्यपालांनी घटनात्मक कर्तव्य लवकरात लवकर पार पाडावे असे निर्देश दिले आहेत. याबाबत भुजबळांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाने काय इशारा दिला आहे हे समजून घ्यावे. मला वाटतं राज्यपाल निश्चितपणे सकारात्मक विचार करतील. न्यायालयाने आदेश नव्हे निर्देश दिले आहेत. राज्यपाल महोदय मुख्यमंत्री राहीलेले आहेत. न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे ते निश्चित सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा करू या, पण राज्यपालांवर अदृश्य दबाव असल्याचा टोलाही त्यांली लगावत केंद्रावर निशाणा साधला.

- Advertisement -

रस्ता होणार असेल तर सर्वच आनंदी होतात
केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे पत्र गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या पत्राबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, खरं म्हणजे आपल्या भागात रस्ता होणार म्हटल्यावर लोकप्रतिधी आनंदी असतात. रस्त्यावर मोठे मोठे फलक झळकावले जातात. परंतु जर काही अडचणी असतील तर समजावून सांगू. मी देखील सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना फार क्वचित अशा अडचणी आल्या. कुणाची अधिकचे भुसंपादन झाले म्हणून तर कुणाचे कमी क्षेत्र संपादित केले म्हणून वाद व्हायचे परंतु याबाबत जर अडचणी असतील तर त्या सोडवल्या जातील असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -