घरक्रीडाकरोनामुळे आयपीएल पुढे ढकलण्याची शक्यता - राजेश टोपे

करोनामुळे आयपीएल पुढे ढकलण्याची शक्यता – राजेश टोपे

Subscribe

सध्या करोना व्हायरसमुळे मोठं मोठे कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकले जात आहेत. त्यामुळे आयपीएल स्पर्धा देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

सध्या जगभरात करोना व्हायरल थैमान घालत आहे. या करोना व्हायरसने भारतात देखील आता प्रवेश केला आहे. चीन आणि इतर देशांमध्ये करोना व्हायरस लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तसंच भारतात करोना व्हायरस लागण झालेल्या संशयितांमध्ये देखील संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. परंतु अद्यापही महाराष्ट्रात करोना व्हायरस लागण झालेला एकही रुग्ण आढलेला नाही आहे. तरी देखील देशांमध्ये वाढत असलेला संसर्ग लक्षात घेता, इंडियन प्रीमिय क्रिकेट लीग (आयपीएल) पुढे ढकल्याची शक्यता आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

काय म्हणाले आरोग्यमंत्री? 

मोठं मोठे कार्यक्रम रद्द होत आहेत. मानवाच मुल्य मोठं आहे. गर्दीच्या ठिकाणी करोनाचा प्रसार होण्याचा जास्त धोका असून शकतो. त्यामुळे आयपीएल सारख्या स्पर्धा नंतर घेतल्या तरी चालतील. म्हणून आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा आणि त्याबाबतीतल निर्णय होण्याची शक्यता आहे. तसंच आयपीएल पुढे ढकलल्या जातील असा अंदाज टोपे यांनी वर्तवला आहे.

- Advertisement -

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी काहीच दिवस बाकी आहेत. २९ मार्चपासून आयपीएलच्या हंगामाची सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नाई सुपर किंग्सचा पहिला सामना रंगणार आहे. मात्र आता भारतात करोना व्हायरस पसरत असल्यामुळे २९ मार्चपासून आयपीएल सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.


हेही वाचा – करोनाचे आव्हान मोठे, एकजुटीने हरवू!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -