घरताज्या घडामोडीIPL 2021 : विराट कोहलीला RCB टीम कर्णधार पदावरुन हटवण्याची शक्यता

IPL 2021 : विराट कोहलीला RCB टीम कर्णधार पदावरुन हटवण्याची शक्यता

Subscribe

भारतीस संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० वर्ल्ड कपनंतर टी-२० सामन्यातील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर विराट कोहलीबाबत अनेक प्रकरणं बाहेर आली आहेत. त्यातच आता आयपीएलच्या यंदाच्या हंगामादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. माजी भारतीय क्रिकेट पटूचे म्हणणे आहे की, सोमवारी युएईमध्ये कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन पाहून पुढील चित्र अगदी स्पष्ट दिसत आहे. आरसीबीची आपयपीएल १४ च्या दुसऱ्या सत्रात खराब पुनरागमन झाले आहे.

जेव्हा केकेआरने पहिल्या सामन्यात फक्त ९२ धावा काढल्या आहेत. यह आयपीएलमध्ये आरसीबीची किमान धावसंख्या होती आणि इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली ते केकेआरकडून नऊ विकेट्सने हारले. पहिली फलंदाजीचा निर्णय घेत विराट कोहलीने ४ चेंडूमध्ये ५ धावा काढल्यावर कृष्णाच्या चेंडूवर बाद झाला. विराट दुसऱ्याच षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या वेगवान चेंडूवर एल्बीडब्ल्यू आऊट झाला. यावर कोहलीने रिव्यू घेतला मात्र या रिव्यूचा काही फायदा झाला नाही.

- Advertisement -

विराट कोहलीची देहबोलीसुद्धा संपूर्ण सामन्या दरम्यान पूर्वीसारखी नव्हती. कोहलीच्या देहबोलीवरुन असे वाटत होते की, आयपीएल २०२१ नंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञांनीही त्याच्या अशा वागण्याकडे लक्ष दिले. गौतम गंभीरनेही याकडे लक्ष दिले आणि त्याच्या निर्णयाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गंभीर म्हणतो की, जर कोहलीला असे काही करायचे असते, तर ते आयपीएलनंतर करू शकला असता.

खराब प्रदर्शनामुळे कर्णधारपद जाऊ शकतं

कोहलीच्या खेळीवरुन असे दिसत आहे की, कोहलीला आरसीबीच्या कर्णधारपदावरून आयपीएमलदरम्यान काढले जाऊ शकते असे एका माजी क्रिकेटपटूनं म्हटलं आहे. कोहली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध असे दिसले की तो सध्या खूप संघर्ष करत आहे. त्याला हंगामाच्या मध्यात काढले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही इतर संघांसोबत असे झालं आहे. केकेआरमधील दिनेश कार्तिक आणि सनरायझर्स हैदराबादमधील डेव्हिड वॉर्नर ते एकतर काढले गेले किंवा ते स्वत:हून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आरसीबीमध्ये सुद्धा असेच होऊ शकते आणखी एका वाईट खेळीनंतर लगेच आरसीबीच्या कर्णधारपदामध्ये बदल झालेला पाहू शकता असे भारतीय माजी क्रिकेटपटूने म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2021: दीपक हुडाची इन्स्टाग्राम पोस्ट वादात, BCCI करणार चौकशी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -