Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रRashmi Shukla : देवेंद्र फडणवीसांसह रश्मी शुक्लांचे कमबॅक होणार? निकालानंतर घेतली गृहमंत्र्यांची...

Rashmi Shukla : देवेंद्र फडणवीसांसह रश्मी शुक्लांचे कमबॅक होणार? निकालानंतर घेतली गृहमंत्र्यांची भेट

Subscribe

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महायुतीचे पुन्हा सरकार स्थापन होणार आहे. महायुतीचे नेते लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान माजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज (24 नोव्हेंबर) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. तर निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना चार आठवड्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले होते. आता महायुतीचे सरकार पुन्हा येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर शुक्लांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. फडणवीसांसोबत शुक्ला देखील कमबॅक करणार का, याची राजकीय वर्तळासह प्रशासकीय वर्तुळाच चर्चा होत आहे.

का पाठवले होते सक्तीच्या रजेवर… 

रश्मी शुक्ला यांच्यावर कॉंग्रेस सातत्याने टीका करत आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं. त्यानंतर संजयकुमार वर्मा यांची निवडणुकीच्या काळापुरती पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

रश्मी शुक्ला या राज्यातील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप असल्यामुळे त्यांना निवडणुकीच्या काळात सक्तीच्या रजेवर पाठवले होते. काँग्रेसने त्यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आयोगाने ही कारवाई केली होती. 30 जून 2024 रोजी शुक्ला या निवृत्त झाल्या आहेत. महायुती सरकारने त्यांना पोलिस महासंचालक म्हणून दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती.

युती सरकारच्या काळात रश्मी शुक्लांना महत्त्वाची पदे

2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्या दरम्यान त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह अनेकांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. 2014 ते 2019 या काळात राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेनेचे सरकार होते. या काळात शुक्लांना अनेक महत्त्वाची पदे मिळाली होती. याच काळात त्या गुप्तचार विभागाच्या प्रमुख होत्या. पोलिस महासंचालक पदी नियुक्ती होण्यापूर्वी त्या सशस्त्र सीमा दलाच्या केंद्र प्रमुख तसेच पुणे पोलिसा आयुक्त होत्या. राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक होण्याचा मान त्यांना मिळाला. 30 जून 2024 रोजी त्या निवृत्त होणार होत्या. मात्र राज्यातील महायुती सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. आता त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे फडणवीस यांच्यासोबत शुक्ला देखील सेवेत कमबॅक करणार का, अशी चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : सर्वात मोठ्या पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; EVM बद्दल म्हणाले…

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -