घरताज्या घडामोडीरेल्वे तिकिट रद्द करू नका, तुमचेच पैसे कापले जातील - IRCTC

रेल्वे तिकिट रद्द करू नका, तुमचेच पैसे कापले जातील – IRCTC

Subscribe

करोना व्हायरसचा भारतातील प्रभाव पाहता येत्या १४ एप्रिलपर्यंत देशातील सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ज्या प्रवाशांनी रेल्वेची ऑनलाईन तिकिटे बुक केली आहेत, अशा प्रवाशांसाठी आता रिफंडची चिंता सतावू लागली आहे. पण भारतीय रेल्वेकडून या सगळ्या ऑनलाईन ऑफलाईन आरक्षण केलेल्या प्रवाशांसाठी एक दिलाशाची माहिती जाहीर केली आहे. ज्या प्रवाशांनी ऑनलाईन तिकिट बुक केले आहे त्यांना ऑनलाईन रिफंड कोणतीही पैशांची काटछाट न करता परत केला जाणार आहे. ज्या बॅंकेच्या खात्यातून तिकिट बुक केले होते त्या खात्यावर हा परतावा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे.

- Advertisement -

महत्वाच म्हणजे ग्राहकांनी स्वतःहून तिकिट रद्द करू नका असे आदेश रेल्वेकडून देण्यात आले आहेत. देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेने सगळ्या गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी स्वतःहून तिकिट रद्द करू नकता. सर्व रेल्वे प्रवाशांना आपोआपच संपुर्ण रिफंड परत केला जाणार असल्याचे इंडियन रेल्वे कॅटरींग टूरीजम कॉर्पोरेशनने जाहीर केले आहे. जर प्रवाशांनी स्वतःहूनच तिकिट ऑनलाईन रद्द केले तर ग्राहकांना याचा फटका बसू शकतो असे रेल्वेचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -