घरCORONA UPDATEIRCTC ने सुरू केली बुकिंग; १५ एप्रिलपासून सुरू होणार भारतीय रेल्वे

IRCTC ने सुरू केली बुकिंग; १५ एप्रिलपासून सुरू होणार भारतीय रेल्वे

Subscribe

देशातील लॉकडाऊन हा १४ एप्रिल रोजी संपणार असल्याने १५ एप्रिलपासून सर्व भारतीय रेल्वेचे बुकिंग सुरू

भारतीय रेल्वेने १५ एप्रिलपासून सर्व रेल्वेचे बुकिंग सुरू केले असून सर्व मार्गावरील प्रवासाच्या तिकीटाची बुकिंग आयआरसीटीसी या वेबसाईटवर देखील उपलब्ध करून दिली आहे. २४ मार्च रोजी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर भारतीय रेल्वेकडून सर्व मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या.

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर देशभरातील मेट्रो, रेल्वे आणि बसेसची सेवा पुर्णतः बंद करण्यात आली होती. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेकडून सर्व रेल्वे प्रवाशांकरिता एक निवेदन जारी केले होते. त्यानुसार १४ एप्रिलपर्यंत सर्व प्रवासी रेल्वेची सेवा बंद करून फक्त मालगाड्या सुरू राहणार असे सांगण्यात आले होते. देशातील लॉकडाऊन हा १४ एप्रिल रोजी संपणार असल्याने १५ एप्रिलपासून सर्व भारतीय रेल्वेचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण खुलासा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेक ठिकाणी असे दावे देखील केले जात होते की रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, थेट केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनीच यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत याचं मला आश्चर्य वाटत आहे. देशात लॉकडाऊनचा २१ दिवसांचा कालावधी वाढवण्याचा केंद्र सरकारचा सध्या कोणताही विचार नाही’, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे १४ एप्रिलनंतर देशातले लॉकडाऊन संपणार असल्याचे सध्या तरी स्पष्ट झाले आहे.


या मंदीत कल्पनेच्याही पलीकडे वेगाने काम करावं लागेल – जागतिक बँकेचा इशारा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -