घरताज्या घडामोडीइरफान शेख आडगाव पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक

इरफान शेख आडगाव पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक

Subscribe

आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर पोलीस मुख्यालयातील वाचक शाखेत कर्तव्यावर असलेले इरफान शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नियुक्तीचे आदेश मिळताच आडगांव पोलीस ठाण्याचा पदभार वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांनी स्विकारला आहे.

पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या तडकापडकी बदलीचे कारण समजू शकले नाही. आडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोरकुमार मोरे यांची देखील तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागेवार अनिल पाटील यांची बदली करण्यात आली होती. आता त्यांचीही बदली करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -