रत्नागिरी : कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता निवृत्त झाल्यामुळे एक एप्रिलपासून या पदावर संतोष कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष कुमार झा 1992 च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी आहेत. (IRTS officer Santosh Kumar Jha has assumed charge of Managing Director of Kokan Railway)
हेही वाचा… कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टीची विक्रमी वसूली
संतोष कुमार झा यांनी एम. एससी., लखनौ विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई येथून मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे. कोकण रेल्वेच्या चेअरमनपदी नियुक्तीपूर्वी संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये संचालक (ऑपरेशन आणि कमर्शियल) म्हणून काम केले आहे. ऑपरेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये त्यांना 28 वर्षांचा अनुभव आहे.
संतोष कुमार यांनी रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये ऑपरेशन्सचे प्रमुख पदही भूषवले आहे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यावसायिक युनिट्सचे नेतृत्व केले आहे. रेल्वे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यावसायिक आणि व्यवसाय विकास भूमिकांमध्ये त्यांना 15 वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे. प्रतिकूल स्थितीत परिस्थिती हाताळणे यात त्यांचा हातखंडा आहे. प्रशिक्षण आणि राजभाषा विभागाने मिळवलेले यश आणि धोरणात्मक नियोजनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब, साइडिंग्स आणि प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल्स (पीएफटी) स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. संतोष कुमार झा यांनी आज एक एप्रिल रोजी कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.