घरताज्या घडामोडीअपात्रतेची कारवाई सुरू असताना राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना शपथ देणे योग्य का? -...

अपात्रतेची कारवाई सुरू असताना राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना शपथ देणे योग्य का? – अनिल परब

Subscribe

ज्या १६ अपात्र आमदारांबाबत न्यायालयता सुनावणी सुरू आहे. त्या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. या सगळ्यांवर अपात्रतेची कारवाई सुरू असताना माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली, ही शपथ घटनात्मक आहे का? असा सवाल न्यायालयासमोर मांडण्यात आला आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी दिली.

ज्या १६ अपात्र आमदारांबाबत न्यायालयता सुनावणी सुरू आहे. त्या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. या सगळ्यांवर अपात्रतेची कारवाई सुरू असताना माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली, ही शपथ घटनात्मक आहे का? असा सवाल न्यायालयासमोर मांडण्यात आला आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी दिली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली. या सुनावणीनंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Is it right for the Governor to administer oath to Eknath Shinde while the disqualification proceedings are going on says Anil Parab)

“सर्वोच्च न्यायालयात आज आमची (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाजू मांडण्यात आली. या सुनावणीच्या प्रक्रियेतील ८ मुद्द्यांपैकी बऱ्याच मुद्द्यांवर वकिल कपील सिब्बल यांनी बाजू मांडली. तसेच, अपात्रतेचा मुद्दा कसा लागू होतो किंवा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अधिकारांवर आमचे सविस्तर म्हणणे आहे, ते आज कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडले”, असेही अनिल परब यांनी म्हटले.

- Advertisement -

“शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगाने शिवसेनेला (शिंदे गट) दिल्याबद्दल आम्ही एसएलपी दाखल केली आहे. त्यावर उद्या दुपारी चर्चा करण्यात येणार आहेत. तसेच, आजही उरलेल्या मुद्द्यावर उद्या कपिल सिब्बल आपली बाजू मांडणार आहेत”, असेही अनिल परब म्हणाले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी आज आपली बाजू मांडली. उर्वरित सुनावणी उद्या होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून ‘त्या’ शिवसैनिकांची हकालपट्टी; वाचा नेमके प्रकरण काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -