घरताज्या घडामोडीकोरोनाच्या नावाखाली ग्रामीण आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होतेय का? जाणून घ्या

कोरोनाच्या नावाखाली ग्रामीण आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होतेय का? जाणून घ्या

Subscribe

ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रशासनाला चांगला प्रतिसाद

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट फार भयावह ठरली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण अवघ्या काही मिनिटांवर आले आहे. कोरोना परिस्थीमध्ये राज्यातील शहरी भागात चिंताजनक आणि भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर ग्रामीण भागातही कोरोना आता हातपाय पसरायला लागला आहे. शहरी भागांत कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. राज्य सरकारचे अधिकाअधिक लक्ष हे शहरी भागांत असल्याचे दिसत आहे. तसेच ग्रामीण भागातही जिल्हाप्रशासनाच्या पातळीवर कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होतान दिसत आहे. शहरात वाढत्या कोरोनामुळे ग्रामीण भागात प्रशासनाचे दुर्लक्ष होतंय का? असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळतोय परंतु ग्रामीण भागातील करोना परिस्थितीवरही काही उपाययोजना केल्या जात आहेत.

ग्रामीण भागातील परिस्थिती कशी आहे.

राज्यात कोरोना संसर्ग फोफावला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. ग्रामीण भागात या लॉकडाऊनमध्ये अधिक सूट दिली असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतकरी वर्ग अधिक आहे. शेतीच्या कामामध्ये सरकारने निर्बंध शिथिल ठेवले आहेत. याच कारणामुळे ग्रामीण भागातील काही ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विळखा हळूहळू ग्रामीण भागात घट्ट होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांतील ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे तर काही ठिकाणी कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळत आहेत. परंतु शहरी भागातील कोरोना परिस्थिती आणि ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती यामध्ये फारसे अंतर नसले तरी प्रशासन ग्रामीण भागातील कोरोना रोखण्यासाठी चांगल्या प्रकारे उपाययोजना करत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत अधिक प्रौढ, वयस्कर नागरिक राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाचा अधिक धोका आहे. ग्रामीण भागात कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासन कोरोनावरील उपायोजना अधिक जलद आणि काटेकोरपणे करताना दिसत आहे. ज्या ठिकाणी रुग्णांना बेडची आवश्यकता भासत आहे. अशा ठिकाणी तातडीने बेड उपलब्ध करण्यात येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येत आहे. कारण शहरी भागांत कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही आहे. परंतु ग्रामीण भागातील नागरिक सामाजिक अंतरासह सर्व नियमांचे पालन करताना दिसत आहेत.

आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होतेय का?

ग्रामीण भागातील काही गावांतील सरपंच आणि नागरिकांना याबाबत विचारले असता सर्व प्रतिक्रिया सकारात्मक आल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या बाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. प्रशासनातर्फे प्रत्येकाला लसीकरणासाठी लसीकरण केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी खास करुन प्रौढांना वाहतूक सेवा उपलब्ध केली होती. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, तहसिलदार, ग्रामसेवक, सरपंच यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येकाला लसीकरणासाठी लसीकरण केंद्रामध्ये पाठवण्यात येत होते.

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामीण भागात स्थानिक प्रशासनाने मास्कचा नियमीत वापर करावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन काटेकोरपणे करावे, हात स्वच्छ धुवावेत तसेच नियमीतपणे हॅण्ड सॅनेटायझरचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच पोलीस प्रशासन रस्ते, गावातील गर्दी होणाऱ्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला देत आहेत. कोणती व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला आरोग्य तपासणी करण्यास सांगितले जात आहे. परिचारिका गावागावात फिरुन कोणाला कसला त्रास होतोय का पाहत आहेत त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती चिंताजनक नसली तरी आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी स्थानिक प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -