घरमहाराष्ट्रराज्यपालांना असे बोलण्यासाठी कोणीतरी स्क्रिप्ट देतंय का? राज ठाकरेंचा सवाल

राज्यपालांना असे बोलण्यासाठी कोणीतरी स्क्रिप्ट देतंय का? राज ठाकरेंचा सवाल

Subscribe

त्यांना कधी कोणती गोष्ट बोलावी? कुठे बोलावी? आणि काय बोलावी, याचे भान नसते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच वादग्रस्त विधान करत असतात. नुकतेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरून सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी सुद्धा राज्यपाल कोश्यारी यांना टोला लगावला आहे.

राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात राज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘त्या माणसाबद्दल काय बोलावं? मला हेच कळत नाही. मी त्यादिवशीच बोललो, ते एका विशिष्ट पदावर आहेत. म्हणून त्यांना सोडून देतो. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. या राजकारणात अशी काही लोकं आहेत, ज्यांना पद येतं पण पोहोच येत नाही. त्यातली ही माणसं आहेत. त्यांना कधी कोणती गोष्ट बोलावी? कुठे बोलावी? आणि काय बोलावी, याचे भान नसते’.

- Advertisement -

‘या आधीही राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही आक्षेपार्ह विधान केले होते. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना उद्देशून राज्यपाल म्हणाले होते की, ही लहान-लहान लेकरं त्याकाळी लग्न कसं करत असतील? पण पूर्वीच्या काळात अशा पद्धतीने लहान मुलांची लग्न व्हायची. भगतसिंह कोश्यारींचे अजूनही लग्न झाले नाही” असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. राज ठाकरे कोल्हापूर मध्ये पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “राज्यपालांना कोणीतरी असे बोलण्यासाठी स्क्रीप्ट देतंय का? ते आपल्या सगळ्यांचे मुख्य प्रश्नांवरून लक्ष वाळवत आहेत. तुमच्याकडून किंवा आमच्याकडून महत्त्वाच्या गोष्टी सरकारला विचारल्या जाऊ नयेत, यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत का? बऱ्याचदा असे प्रयत्न केले जातात” असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – मीडियासमोर माझ्यासोबत चर्चा करा; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले ओपन चॅलेंज

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -