घरमहाराष्ट्रगृहमंत्र्यांच्या कुटुंबातील ब्लॅकमेलिंग प्रकरण स्टंटबाजी नाही का? वाचा, संजय राऊत असं का...

गृहमंत्र्यांच्या कुटुंबातील ब्लॅकमेलिंग प्रकरण स्टंटबाजी नाही का? वाचा, संजय राऊत असं का म्हणाले

Subscribe

गृहमंत्र्यांच्या कुटुंबियांबद्दल तातडीने कारवाई होती. आरोपींना पकडले जाते. तिच तत्परता विरोधकांच्या बाबतीत दाखवली जात नाही. विरोधकही माणसं आहेत. त्यांनाही कुटुंब आहे. आणि सत्ता कायम राहात नसते, हेही त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राऊत यांच्या मोबाईलवर मेसेज करुन ही धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी ठाण्यातील गुंडाला संजय राऊत यांच्या हत्येची सुपारी दिल्याला आरोप स्वतः राऊत यांनी गृहमंत्र्यांकडे केला होता. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत हे प्रसिद्धीत राहाण्यासाठी स्टंटबाजी करतात, असे म्हटले होते. ठाणे षडयंत्र प्रकरणानंतर राऊत यांना ही दुसरी धमकी देण्यात आली आहे.

गृहमंत्र्यांच्या कुटुंबियांना ब्लॅकमेलिंग केली जाते, त्यावर तातडीने कारवाई होते. ते ब्लॅकमेलिंगचे प्रकरण स्टंटबाजी नाही का? असा सवाल राऊत (Rajya Sabha MP Sanjay Raut)  यांनी केला आहे. विरोधकांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. मुख्यमंत्र्यांचा मुलगा गुंडांच्या माध्यमातून हल्ला करण्याचे षड्यंत्र रचतो, याला गृहमंत्री स्टंट म्हणतात. तेव्हा त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की तुमची स्टंटबाजीही आम्हाला माहित आहे, पण आम्ही मर्यादा पाळतो, असा टोला राऊत यांनी देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना लगावला.

- Advertisement -

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर धमकी प्रकरणी चौकशीसाठी पोलिस खासदार राऊत यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. धमकीचा मेसेज पुण्यातून आल्याची प्राथमिक माहिती आहे.

या राज्यात गव्हर्नमेंट स्पॉन्सर गुंडगिरी आणि दंगली सुरु असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी, जळगाव येथे रामनवमीच्या निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. रामनवमीला घडलेल्या या घटना सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचा मुलगा वारंवार गुंडाच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. याची माहिती मी गृहमंत्र्यांना दिली होती. त्याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्टंटबाजी म्हणतात. ठाण्यात जामीनावर बाहेर आलेला एका गु़डाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली गेली आहे. माझ्यावर हल्ला करण्याच्या या षड्यंत्राची माहिती मी गृहमंत्र्यांना दिली होती. त्याविरोधात गृहमंत्र्यांनी काय कारवाई केली? असा सवाल राऊतांनी केला आहे.

हेही वाचा : गृहमंत्रालय झेपत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळेंचं विधान

काय आहे गृहमंत्र्यांचे ब्लॅकमेलिंग प्रकरण
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक बुकी ब्लॅकमेल करत असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला गुजरातमधून (Gujarat) अटक करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानीची मुलगी डिझायनल अनिक्षा हिला देखील ब्लॅकमेलिंग आणि धमकी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन राऊत यांनी गृहमंत्र्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, तुमच्या घरातील ब्लॅकमेलिंगचे प्रकरण स्टंटबाजी नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. गृहमंत्र्यांच्या कुटुंबियांबद्दल तातडीने कारवाई होते. आरोपींना पकडले जाते. तिच तत्परता विरोधकांच्या बाबतीत दाखवली जात नाही. विरोधकही माणसं आहेत. त्यांनाही कुटुंब आहे. आणि सत्ता कायम राहात नसते, हेही त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

जनभावना सरकारच्या विरोधात आहे, त्यामुळे राज्यात दंगली भडकवल्या जात आहेत, आणि मुळ प्रश्नांकडून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोपही राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

छत्रपती संभाजीनगरची वज्रमूठ सभा ही होणारच, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. या सभेला मराठवाड्यासह आसपासच्या अनेक जिल्ह्यातून लोक येणार आहेत. रेकॉर्ड ब्रेक अशी ही सभा होईल, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा : लाॅरेन्स बिश्नोईच्या नावाने खासदार संजय राऊत यांना जीव मारण्याची धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -