घरमहाराष्ट्रराज्यात लोडशेडिंगचे संकट गहिरे? वीज उत्पादन आणि मागणीचा ताळमेळ साधण्यासाठी महावितरणाची कसरत

राज्यात लोडशेडिंगचे संकट गहिरे? वीज उत्पादन आणि मागणीचा ताळमेळ साधण्यासाठी महावितरणाची कसरत

Subscribe

जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला आहे. त्याचा परिणाम विजेच्या उत्पादनावरदेखील झाला.

जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला आहे. त्याचा परिणाम विजेच्या उत्पादनावरदेखील झाला. विजेचे घटलेले उत्पादन व वाढलेल्या मागणीचे ताळमेळ साधण्यात महावितरणाची कसरत होत आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र सर्वाधिक वीजहानी होणाऱ्या फीडर्सवर महावितरणने आपत्कालीन भारनियमन सुरू केले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना भारनियमानाचे चटके बसत आहेत. राज्यातील सातही औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती सलग तिसऱ्या दिवशी प्रभावीत झाली आहे, त्यामुळे राज्यातील वीज संकट वाढण्याची शक्यता आहे. (Is the crisis of load shedding deep in the state Mahadistrivan exercise to match power generation and demand

महाराष्ट्रात एकूण सात औष्णिक विद्युत केंद्र आहेत. या सात केंद्रावरून राज्यासाठी विजनिर्मिती केली जाते. परंतु, आज सलग तिसऱ्या दिवशी या केंद्रावरील वीजनिर्मिती प्रभावित झाल्यानं राज्यातील वीज संकट गहिरं होण्याची शक्यता आहे. पाऊस, ओला कोळसा आणि दुरूस्तीची कामं खोळंबल्यानं या सातही वीजनिर्मिती केंद्रांच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्केच वीजनिर्मिती सध्या सुरू आहे. आणखी काही दिवस असंच सुरू राहिलं तर मात्र, राज्याला भारनियमनाला सामोरं जावं लागू शकतं.

- Advertisement -

वीज हानीनुसार ठरले फीडर्स

महावितरणने वीज नियामक अयोगाच्या निर्देशानुसार विद्युत वाहिन्यांचे वर्गीकरण केले आहे. वितरण व वाणिज्यिक हानी प्रमाणात फीर्डस निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ए ते जी-3 पर्यंतच्या फीडर्सचा समावेश आहे. 50 टक्क्यांवर वीजहानी असलेले फीडर्स जी-1 मध्ये मोडतात, तर 55 टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी होणारे फीडर्स जी-2 मध्ये व 65 टक्क्यांपर्यंत वीज हानीच्या फीडर्सचा समावेश जी-3 मध्ये आहे. सध्या याच तीन फी़डर्समध्ये भारनियमन करण्यात येत आहे.

(हेही वाचा: डर अच्छा है…, मुख्यमंत्री शिंदे यांचा परदेशदौरा पुढे ढकलल्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -