Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र संवाद संपलाय का?; एकाच दिवशी १८ वर्षीय तरुणीसह तिघांची आत्महत्त्या

संवाद संपलाय का?; एकाच दिवशी १८ वर्षीय तरुणीसह तिघांची आत्महत्त्या

Subscribe

नाशिक : नाशिक शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये गेल्या सोमवारी चौघांनी गळफास घेत आत्महत्त्या केल्या आहेत. यात एक अकरावीची महाविद्यालयीन विद्यार्थीनी असून, तिघे पुरुष आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे. धकाधकीचे जीवन, स्पर्धात्मक युग आणि खालवत चाललेल मानिसिक स्वास्थ तसेच कमी झालेला संवाद यामुळे धैर्य, संयम यांचा अभाव निर्माण झाला असून एकटेपणाची व पराभवाची भावना निर्माण होत आहे. यातून आत्महत्येच्या घटना वाढताना दिसून येत आहेत.

दरम्यान शहरात झालेल्या पहिल्या घटनेत, पंचवटी परिसरातील कन्या छात्रालयासमोरील झाडाला २९ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. गौतम ओमकार देहाडे (२९) असे मयत युवकाचे नाव आहे. गौतम याने गेल्या सोमवारी (दि. १) मातोश्री कन्या छात्रालय समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाला फेट्याच्या कापडाने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

दुसऱ्या घटनेत, लहवित येथे घरातील सर्व बाहेर गेलेले असताना १८ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली. पायल बबन शेने (१८) असे मयत युवतीचे नाव आहे. पायल ही गेल्या सोमवारी (दि. १) घरात एकटीच होती. तिने अज्ञात कारणातून राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. आत्महत्त्येमागील कारण अस्पष्ट असून, घरात चिठ्ठीही मिळून आलेली नाही. पायल अकरावीच्या वर्गात शिकत होती. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

तिसऱ्या घटनेत, जय भवानी रोड परिसरात राहणार्‍या ४२ वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक कारणातून गळफास घेत आत्महत्त्या केली. पंकज झा (४२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पंकज यांनी गेल्या सोमवारी (दि. १) सकाळी राहत्या घरात छताच्या लोखंडी हुकाला गळफास लावून घेतला. सदरची बाब मुलगा पार्थ याच्या लक्षात आल्यानंतर त्याने शेजारील बंटिधर जोशी यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. झा यांनी कौठुंबिक कारणातून आत्महत्त्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येते आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास इम्रान शेख हे करीत आहेत.

- Advertisement -

चौथ्या घटनेत, सिडकोतील प्लंबिंग व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली. विजय शिवलाल इखनकर (३७) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. इखनकर यांनी सोमवारी (दि. १) दुपारी बारा वाजेपूर्वी राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेतला. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून, आत्महत्त्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, पोलीस नाईक किरण देशमुख हे तपास करीत आहेत.

- Advertisment -