सीमावादाचा प्रश्न हा काही गोष्टींकडून लक्ष वळविण्याचा प्रयत्न आहे का? राज ठाकरेंचा सवाल

आगामी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढविणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पासून म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर असणार आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे या दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वी राज ठाकरे कोल्हापूरमध्ये दाखल झाले. अंबाबाईचे दर्शन घेऊन राज ठाकरे कोकण दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. दरम्यान, कोल्हापूर मधून राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, पत्रकार परिषद झाल्या नंतर मी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन निवडणुकीच्या सृष्टिकोनातून त्यावर जी पावले उचलणे गरजचे आहे ती उचलेन. असे राज ठाकरे म्हणाले.

यासोबतच, कोणताही लढा हा प्रस्थपितांविरोधातच असतो. प्रस्थापितांविरोधातील लढ्याला यश आलेले १९९५ ते १९९९ या काळात सर्वांनीच पहिले आहे. त्यामुळे विशिष्ट एका पक्षाच्या असलेल्या बालेकिल्ल्याला धक्का बसून तो हलत असतो आणि ते यापुढेही असे बालेकिल्ले हलतील असे म्हणत राज ठाकरे यांनी निवडणुकांसंदर्भांत विरोधकांना इशारा दिला आहे. प्रत्येक पक्षाचे अंतर्गत काम हे सुरूच असते पण प्रत्येकवेळी ते जाहीरपणे सांगायलाच हवे असे नाही. तसे आमच्या पक्षाचे सुद्धा काम सुरु आहे.

सीमा प्रश्नावरही राज ठाकरेंचे विधान
सीमा प्रश्न हा अचानक कसा वर येतो. म्हणजेच इतर कोणत्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष कोणाला वळवायचे आहे का? ही बाब लक्षात घेणे जरजेचे आहे. पण या सर्व गोष्टी अचानक कशा समोर येतात ते काळत नाही. असे राज ठाकरे म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भांत काय म्हणाले राज ठाकरे
आगामी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढविणार असे राज ठाकरे म्हणाले. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची आहे. अशातच मनसेने सुद्धा ही निवडणूक स्वबळावर लढविणार असे जाहीर केले आहे. ज्यांना आमची ताकद बोचते ते असे आरोप करतात असे म्हणत राज ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मी केवळ माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतो. इतर कोणासाठी नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान,अंबाबाईचे दर्शन घेऊन मी उद्या सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मी कोकण दौरा सुरु करत आहे. मध्यंतरी माझा नागपूर दौरा सुरु होता. त्या नंतर मी आता कोकण दौरा सुरु करत आहे. कोकण दौरा झाल्यानंतर माझा पुढचा दौरा पश्चिम महाराष्ट्रात असले. असे राज ठाकरे म्हणाले.


हे ही वाचा – मीडियासमोर माझ्यासोबत चर्चा करा; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले ओपन चॅलेंज