NIA ची मोठी कारवाई; आयसीसशी संबंधावरुन पुण्यातून एका महिलेसह दोघांना अटक

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी मॉक आयईडी स्फोटही केला. त्याला त्याच्या ऑनलाइन हँडलरकडून क्रिप्टो-चलनातून आर्थिक सहाय्य दिले जात होते. मोठ्या कटाचा एक भाग म्हणून आरोपी मोहम्मद शरीकने गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी मंगळूर येथील कादरी मंदिरात आयईडी स्फोट घडवून आणण्याची योजना आखली होती.

NIA-Pune-Action
मोठ्या कटाचा एक भाग म्हणून आरोपी मोहम्मद शरीकने गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी मंगळूर येथील कादरी मंदिरात आयईडी स्फोट घडवून आणण्याची योजना आखली होती.

पुण्यातील वानवडी परिसरात राष्ट्रीय तपास संस्था NIA ने मोठी कारवाई केली आहे. इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत (ISKP) प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. पुण्यात देखील छापे टाकण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आलीय.

केंद्रीय एजन्सीने शनिवारी मध्य प्रदेशातील सिवनी येथील चार आणि पुण्यातील एका ठिकाणी छापे टाकले. एनआयएच्या पथकांनी पुण्यातील तलहा खान आणि सिवनी येथील अक्रम खान यांच्या घरांची झडती घेतली. दिल्लीतील जामिया येथील ओखलामधून काश्मिरी जोडपे जहांजैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग यांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने हा गुन्हा दाखल केला असल्याचं एनआयएने सांगितले आहे.

आणखी एक आरोपी अब्दुल्ला बासित याची भूमिका समोर आली आहे. हा आरोपी आधीच तिहार तुरुंगात दुसर्‍या एका प्रकरणात शिक्षा भोगत आहे. NIA ने शिवमोग्गा IS कट रचल्या प्रकरणी सिवनी येथे आणखी तीन ठिकाणी शोध घेतला. संशयित अब्दुल अजीज सलाफी आणि शोएब खान यांच्या निवासी आणि व्यावसायिक जागेचा शोध घेण्यात आला. शिवमोग्गा प्रकरणात परदेशातून रचलेल्या कटाचा एक भाग म्हणून आरोपी मोहम्मद शारीक, माझ मुनीर खान, यासीन आणि इतरांनी परदेशात असलेल्या त्यांच्या हँडलरच्या सूचनेनुसार सार्वजनिक आणि खाजगी मालमत्ता असलेले गोदामे, दारूची दुकाने टार्गेटवर ठेवली होती. हार्डवेअरची दुकाने, वाहने, विशिष्ट समुदायाच्या सदस्यांच्या मालकीच्या इतर मालमत्तेची जाळपोळ, तोडफोड अशा एकूण २५ हून अधिक घटना त्यांनी घडवून आणल्या.

१९ नोव्हेंबर रोजी आयईडी स्फोटाचा कट?
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी मॉक आयईडी स्फोटही केला. त्याला त्याच्या ऑनलाइन हँडलरकडून क्रिप्टो-चलनातून आर्थिक सहाय्य दिले जात होते. मोठ्या कटाचा एक भाग म्हणून आरोपी मोहम्मद शरीकने गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी मंगळूर येथील कादरी मंदिरात आयईडी स्फोट घडवून आणण्याची योजना आखली होती. मात्र, अपघातात IED वेळेपूर्वीच स्फोट झाला. ४० वर्षीय अब्दुल सलाफी सिओनी हे जामिया मशिदीत मौलाना आहेत, तर २६ वर्षीय शोएब ऑटोमोबाईलचे सुटे भाग विकतो.

सलाफी आणि त्यांचा सहकारी शोएबसह ‘निवडणुकीत मतदान करणे मुस्लिमांसाठी पाप आहे’ अशा संदेशांचा सक्रियपणे प्रचार करताना आढळले. मौलाना अझीझ सलाफी यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील अनेक राज्यांतील भोळ्या मुस्लिम तरुणांना यूट्यूबवर भडकाऊ आणि प्रक्षोभक भाषणाद्वारे कट्टरपंथी बनविण्याच्या प्रक्रियेत होता. “ते सिवनी जिल्ह्यात अशा कट्टरपंथी लोकांना एकत्र आणण्याचाही प्रयत्न करत होते.”