घरक्राइमबाप रे! कोल्हापुरात बनावट सोने विकून व्यापाऱ्याला ३ लाखांचा गंडा

बाप रे! कोल्हापुरात बनावट सोने विकून व्यापाऱ्याला ३ लाखांचा गंडा

Subscribe

व्यापाऱ्याकडे बनावट सोने गहाण ठेवून ३ लाखाचे कर्ज घेऊन गंडवल्याची घटना समोर आली आहे.

व्यापाऱ्याकडे बनावट सोने गहाण ठेवून ३ लाखाचे कर्ज घेऊन गंडवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापूर येथील इस्लामपूर बसस्थानक परिसरात घडली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू व्यापाऱ्याच्या डोळ्याला बनावट सोन्याची पारखही होणार नाही, अशा पद्धतीने चोरट्यांनी लुटले असल्याने एकच खळबळ माजली आहे.

विनोद पारसमल भंडारी आणि विरेश ऊर्फ लोकेश आण्णाप्पा कुरले अशी या दोघा भामट्यांची नावं आहेत. यातील विनोद हा कोल्हापुरमधील बिंदू चौक तर विरेश हा ऐश्वर्या पार्कमध्ये राहणार आहे. विनोद आणि विरेश ३१ जानेवारीला इस्लामपुरात नितीन भंडारी या व्यापाऱ्याकडे आले. यावेळी विनोदने विरेशच्या आईच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांची गरज असल्याचं सांगितलं. आईच्या उपचारासाठी त्यांच्या ८३ ग्रॅम वजनाच्या हॉलमार्कच्या दोन साखळ्या गहाण ठेवत आहोत, असं सांगितलं. त्याबदल्यात त्यांनी व्यापाऱ्याकडून तब्बल 3 लाख 25 हजार रुपये घेतले होते.

- Advertisement -

व्यापारी नितीन भंडारी यांनी दोन साखळ्यांची तपासणी केली असता त्या बनावट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे नितीन भंडारी यांनी दोघांकडे पैशाची मागणी केल्यावर दोघांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापारी नितीन भंडारी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

कोल्हापुरातील दोन भामट्यांविरोधात इस्लामपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -