घरमहाराष्ट्रबॅनरबाजी केली म्हणजेच 150 जागा झोळीत आल्या असं नाही; पेडणेकरांचा आशिष शेलारांना...

बॅनरबाजी केली म्हणजेच 150 जागा झोळीत आल्या असं नाही; पेडणेकरांचा आशिष शेलारांना टोला

Subscribe

म्ही प्रचंड खोटं बोलून आणि आभास निर्माण करून शिवसेनेची जनतेशी जी नाळ जोसलेली आहे ती तोडण्याचा प्रयत्न करत आहात. आम्ही नेहमी गर्दीचा विक्रम मोडत आलो आहोत, शिंदे गटाच्या आमदारांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या का असतात? असा सवालही त्यांनी केला. काहींच्या लाखोंच्या संख्येने सभा होतात मात्र त्यांचे उमेदवार जिंकत नाहीत''.अशी बोचरी टीकाही पेडणेकरांनी केली.

राज्यातील राजकारणात मोठया प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. अशातच 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यावरूनही सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांच्या पैकी कोणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे.दरम्यान आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला आहे. त्याच बरोबर इतरही मुद्यांवरून पेडणेकरांनी विरोधकांना धारेवर धरलं आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा आज वाढदिवस आहे, ”शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ”150 मिशन असे बॅनर लावले म्हणजेच 150 जागा झोळीत आल्या असे होत नाही, त्यासाठी जनतेशी नाळ जोडलेली असायला हवी, पण तुम्ही प्रचंड खोटं बोलून आणि आभास निर्माण करून शिवसेनेची जनतेशी जी नाळ जोसलेली आहे ती तोडण्याचा प्रयत्न करत आहात. आम्ही नेहमी गर्दीचा विक्रम मोडत आलो आहोत, शिंदे गटाच्या आमदारांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या का असतात? असा सवालही त्यांनी केला. काहींच्या लाखोंच्या संख्येने सभा होतात मात्र त्यांचे उमेदवार जिंकत नाहीत”.अशी बोचरी टीकाही पेडणेकरांनी केली.

- Advertisement -

रामदास कदम यांच्यावरही पेडणेकरांनी निशाणा साधला, ”तुमचं चारित्र्य काय? तुम्ही उगाच चोच का मारता? असं विचारत पेडणेकरांनी रामदास कदमांवर निशाणा साधला. त्याचबरोबर तुम्हीच भर विधानसभेत म्हणाला होता की बाळासाहेब आणि उद्धध्व ठाकरे यांनी खूप काही दिलं, त्यामुळे आता तुम्हाला कुणी विचारलं नाही तुम्ही समाधानी आहात की नाही ते”

त्याचबरोबर कोण कोणाचे महत्व वाढवत नाही. प्रत्येकाच्या वर्तणुकीमुळे महत्व ठरते. कोव्हीच्या काळात उद्धव ठाकरेंनी केलेलं काम जनतेने पाहिलं आहे ते सर्वांसमोर आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर रश्मी ठाकरे राजकारणी नाहीत, त्या आम्हा महिलांमध्ये रमतात. त्या दरवर्षी ठाण्यात देवीच्या संरक्षणासाठी जातात सध्याच्या बदललेल्या परिस्थिती त्या ठाण्याला गेल्या यात नवल काही नाही. असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा 

5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिवतीर्थवर मोठया प्रमाणात टायरची करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादीकडूनही ठाकरेंना पाठिंबा दर्शविणारे बॅनर दादर आणि वरळी परिसरात लावण्यात आले आहेत. त्यावर पेडणेकर म्हणाल्या. ”सगळ्यांना कळत आहे. बाळासाहेबांचा खरा वारसा कोण जपत आहे आणि पुढे घेऊन जात आहे. त्यामुळेच सर्वजण उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत आहेत”.


हे ही वाचा – आम्हीही सत्तेत होतो पण माज नाही केला; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -