Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र लोकशाही धोक्यात असल्याचं आज सिद्ध झालं, आदित्य ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

लोकशाही धोक्यात असल्याचं आज सिद्ध झालं, आदित्य ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

Subscribe

Aditya Thackeray Reaction on Rahul Gandhi | आपल्या देशात सत्य बोलणाऱ्यांना स्कोप राहिला नाही. सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यावर कारवाई होते. त्यामुळे देशाच्या लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray Reaction on Rahul Gandhi | मुंबई – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे संसदीय सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याप्रकरणी विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाविरोधात एल्गार पुकारला असून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आता माजी मंत्री तथा विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनीही लोकशाही धोक्यात असल्याचा पुनरुच्चार केला.

हेही वाचा खासदारकी गेल्यानंतरही काँग्रेस म्हणते राहुल गांधी पंतप्रधान बनणार; इंदिराजींनाही…,

- Advertisement -

आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळंच धक्कादायक आहे की अशा एका केसनंतर तातडीने रद्द करणं हे गरजेचं होतं का, असा प्रश्न पडतो. मुळात आम्ही सतत सांगत आलो आहोत की, लोकशाही धोक्यात आहे. आजचं पाऊल हेच दाखवतंय की लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही धोक्यात असल्याचं आज सिद्ध झालं. ज्यांच्या मनात भीती असते आणि ऐकून घेण्याची क्षमता नसते तेव्हाच असं घडतं. आपल्या देशात सत्य बोलणाऱ्यांना स्कोप राहिला नाही. सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यावर कारवाई होते. त्यामुळे देशाच्या लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

- Advertisement -

“चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केलीय. तसंच चोर देश लुटणारे आजही मोकाट आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. पण तरीही लढत राहू.” अशी तिखट शब्दात उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिलीय.

आम्ही गुडघे टेकणार नाही असं म्हटल्यावर आमच्यावर कारवाई झाली. आता आम्ही लढलो नाही किंवा ज्यांना लढाईची इच्छा नाही त्यांनी गुलामीची तयारी ठेवा, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. लोकसभा सचिवालय एक फ्रॉड आहे, असंही ते म्हणाले.

- Advertisment -