घरताज्या घडामोडीआमदारांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण; नारायण राणेंची शरद पवारांना धमकी

आमदारांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण; नारायण राणेंची शरद पवारांना धमकी

Subscribe

“बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल”, अशी धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख करत ते आपल्यासाठी काहीही पडून देणार असे म्हटले. त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत ‘सत्तास्थापनेसाठी आसामध्ये असलेल्या आमदारांना इथे यावे लागेल’ असे म्हटले. त्यानंतर नारायण राणे यांनी “माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.”, असे शरद पवारांना धमकी देणारे ट्विट केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी शरद पवारांसह शिवसेना नेते संजय राऊत यांनाही आव्हान दिले आहे. (It is difficult to reach home if push to their hair of the MLA is hit Narayan Rane threatens Sharad Pawar)

नारायण राणेंचे पहिले ट्विट

- Advertisement -

“सन्माननीय नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत, ते व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे.” , असे आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले.

नारायण राणेंचे दुसरे ट्विट

- Advertisement -

“माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.” असे राणे यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले.

नारायण राणेंचे तिसरे ट्विट

“संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा.”, असे राणे यांनी आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले.

नारायण राणेंचे चौथे ट्विट

 “आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही.”, असे राणे यांनी आपल्या चौथ्या ट्विटमध्ये म्हटले.

शदर पवार नेमके काय म्हणाले?

“बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटतोय. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे. जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत. मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना इकडे यावंच लागेल.”, असे पवार यांनी म्हटले.


हेही वाचा – शरद पवारांच्या एन्ट्रीने फडणवीसांचा सत्ता स्थापनेचा खेळ लांबला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -