घरमहाराष्ट्रराजकारण करणारे नितीन गडकरींचा सल्ला मानतील हीच अपेक्षा; रोहित पवारांचं खोचक ट्विट

राजकारण करणारे नितीन गडकरींचा सल्ला मानतील हीच अपेक्षा; रोहित पवारांचं खोचक ट्विट

Subscribe

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना कोरोनाच्या काळात राजकारण करु नका, असं सांगत फटकारलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट केलं आहे. कोविडच्या लढाईत कुणीही राजकारण करू नये, हा सन्माननीय नितीन गडकरी साहेबांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. अपेक्षा आहे राजकारण करणारे, त्यांचा हा सल्ला मानतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी नितीवन गडकरी यांनी भाजपला दिलेल्या सल्ल्यावरुन खोचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. “कोविडची लढाई लढत असताना आजच्या अडचणीच्या काळात कुणीही राजकारण करू नये’, हा सन्माननीय नितिन गडकरी साहेबांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. ते देशातले मोठे नेते आहेत. माझ्यासारखे अनेकजण त्यांच्याकडून शिकत असतात. अपेक्षा आहे राजकारण करणारे, त्यांचा हा सल्ला मानतील!” असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले गडकरी?

शनिवारी भाजप नागपूर महानगर कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी गडकरींनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. पंथ, पक्ष, धर्म, जात विसरून सध्या रुग्णांना मदत करा. कठीण काळ आहे. थोडी मदत केली तर बोर्ड आणि झेंडे लावायची गरज नाही. सेवेचे राजकारण करणे लोकांना तसेही आवडत नाही. कोणताही पक्षभेद न करता सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्या. लोक ही सेवा लक्षात ठेवतील, असं गडकरी म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -