घरताज्या घडामोडीछत्रपतींच्या भुमीत असे करणे योग्य नाही : संभाजीराजे

छत्रपतींच्या भुमीत असे करणे योग्य नाही : संभाजीराजे

Subscribe

एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. विशेष गोष्ट म्हणजे ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. ओवेसी यांच्या या कृतीमुळे महाराष्ट्रात येऊन शिवप्रेमींचा अपमान केला असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. याबाबत नाशिक दौर्‍यावर आलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांना विचारले असता छत्रपतींच्या भुमीत असे करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची औरंगाबादेत सभा पार पडली. तत्पूर्वी अकबरुद्दीन ओवेसी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी भेट दिली. औरंगजेबाच्या कबरीवर त्यांनी चादरही चढवली. शुक्रवारी नाशिक दौर्‍यावर आलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, मी रात्री उशिरा या ठिकाणी पोहचलो. याबाबत मला कानावर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊनच बोलणे उचित ठरले. परंतू जर असं असेल तर ही गोष्ट मात्र बरोबर नाही. ही शिवाजी महाराजांची भुमी आहे आणि या भुमीत असे करणे बरोबर नाही. संभाजीराजे यांनी स्वराज्य या संघटनेची घोषणा केली. सध्या देशात महागाई वाढत असून याबाबत संघटनेची भुमिका काय असा प्रश्न केला असता ते म्हणाले. कोणतेही संकट किंवा प्रश्न उभा राहील्यानंतर त्यावर उपाययोजना करणे चुकीचे आहे. अशा प्रकारच्या समस्या येऊ नये याकरीता दुरगामी नियोजन करणे आवश्यक आहे. मे अखेर किंवा जून महिन्यात मी महाराष्ट्र दौरा करणार आहे. त्यावेळी याबाबत सविस्तर चर्चा करेल असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -