घरताज्या घडामोडीIT Raid : कोणाच्या काळात कारखाने कधी, कितीला विकले पुराव्यानुसार सांगेल, अजितदादांचा...

IT Raid : कोणाच्या काळात कारखाने कधी, कितीला विकले पुराव्यानुसार सांगेल, अजितदादांचा इशारा

Subscribe

कारखान्याचा मालक कोण कारखान्याच्या परिसरातील लोकांची भावना काय हे सगळं तपासून बघा लोकं तुम्हाला सांगतील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधीत असलेल्या व्यक्तींच्या घरी आणि कंपन्यांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाची छापेमारी पुर्ण झाल्यावर सविस्तर बोलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. पाहुणे मुक्कामी आहेत ते गेल्यावर कोणाच्या काळात, कोणी, किती रुपयांना कारखाने विकले हे सर्व सविस्तर सांगणार असे अजित पवार यांनी सांगितले आहे. कारखान्यांसंदर्भात महाराष्ट्रातील सर्व माहिती देणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. तसेच कोणी काही बोललं त्यांच्या तोंडाशी लागण्याचे कारण नाही अशी खोचक टीका अजित पवार यांनी अप्रत्यक्ष केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधीत असलेल्यांच्या घरी, नातेवाईकांच्या आणि पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर करण्यात आलेल्या छापेमारीवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी म्हटलं आहे की, पाहुणे वेगवेगळ्या घरी आले आहेत. आता सध्या चौकशी सुरु आहे. ते त्यांचे काम करत आहेत. काम पुर्ण झाल्यानंतर ते गेल्यावर मी प्रतिक्रिया देणार आहे. अधिकाऱ्यांनी मुक्काम त्याच ठिकाणी केला आज पुन्हा काम सुरु केलं आहे. ते काम संपल्यावर प्रतिक्रिया देईल असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पुण्यातील पर्यटनस्थळे पुर्ण क्षमतेने सुरु, हॉटेल ११ पर्यंत सुरु राहणार, अजित पवारांची घोषणा


पुराव्यानुसार कारवाईवर उत्तर देईल

जे कारखाने विकले गेले ते कोणाच्या सांगण्यामुळे विकले गेले ते हायकोर्टाच्या सांगण्यामुळे विकण्यात आले की आणखीन कोणाच्या सांगण्यामुळे विकले गेले? हायकोर्टाने त्यांना १ वर्षांची मुभा कशी दिली होती. सेशन कोर्टाने काय निकाल दिला, हायकोर्टाने काय निकाल दिला. त्याच्यानंतर काही गेल्यानंतर त्यांना पण हायकोर्टाने सुनावले की, झालेली प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली आहे. हे सगळं पुराव्यानुसार दाखवलं जाईल मला कोणाच्या तोंडाशी लागण्याचे कारण नाही. त्यांनी असं म्हटलं म्हणून मी असे म्हणायचे ते पुन्हा पुन्हा शीळ्या कढीस ऊत आणण्याचा काम काही वेळी केलं जाते परंतु ते सगळ्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत कारखान्याचा मालक कोण कारखान्याच्या परिसरातील लोकांची भावना काय हे सगळं तपासून बघा लोकं तुम्हाला सांगतील असे अजित पवारांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कार्यकर्त्यांना आवाहन

अजित पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. यावर अजित पवांनी म्हटलं आहे की, आयकर विभागाला कायद्याने अधिकार दिला आहे. काय योग्य, काय अयोग्य , कॅश, कागदपत्र सापडतात का हे पाहू आता बोलून त्यांच्या चौकशीला त्रास होऊ द्यायचा नाही. अशा पद्धतीने वागून चालत नाही. कायदा कायद्याच्या पद्धतीने काम करत असतो संस्था संस्थेच्यापद्धतीने काम करत असते. त्यामुळे कार्यकर्त्यांना जाण्यासाठी सांगितले असल्याचे अजित पवारांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रात IT च्या दुसऱ्या दिवशीही धाडी सुरु, १ हजार ५० कोटींचे आढळले संशयास्पद व्यवहार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -