घरदेश-विदेशIT Raid On Dhiraj Sahu : धीरज साहू भाजपात आले तर क्लीनचिट...

IT Raid On Dhiraj Sahu : धीरज साहू भाजपात आले तर क्लीनचिट देणार का? ठाकरे गटाचा सवाल

Subscribe

काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीर साहू यांच्या कंपनी आणि घरावर प्राप्तिकर विभागाने चार दिवसांपूर्वी छापा टाकला होता. तेव्हापासून आजपर्यंत साहू यांच्याकडील रोकड मोजण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे मात्र, देशातील राजकारण तापले असून, भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगलेला असतानाच या वादात ठाकरे गटानेही उडी घेतली आहे.

नवी दिल्ली : मागील तीन ते चार दिवसांपासून देशात चर्चा सुरू आहे ती प्राप्तिकर विभागाच्या एका कारवाईची. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कंपनी आणि घरावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकून आतापर्यंत 300 कोटीहून अधिक रोकड जप्त केली आहे. या कारवाईवरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. साहू जर भाजपवासी झाले तर क्लिनचीट देणार का? असा थेट सवालच त्यांनी विचारला आहे. (IT Raid On Dhiraj Sahu  If Dhiraj Sahu joins BJP will he give a cleancheat A question from the Thackeray group)

काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीर साहू यांच्या कंपनी आणि घरावर प्राप्तिकर विभागाने चार दिवसांपूर्वी छापा टाकला होता. तेव्हापासून आजपर्यंत साहू यांच्याकडील रोकड मोजण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे मात्र, देशातील राजकारण तापले असून, भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगलेला असतानाच या वादात ठाकरे गटानेही उडी घेतली आहे. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजप नेत्यांना काही प्रश्ना विचारले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्यांवरील आरोपांचा संदर्भ देत चतुर्वेदी म्हणाल्या की, अजित पवार यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्याच्यावरील ईडी आणि आयटीची कारवाईही संपुष्टात आली आहे. तर आगामी काळात धीरज साहू भारतीय जनता पक्षात आले तर या सर्व प्रकरणात त्यांना क्लीन चिट दिली जाणार नाही, असे आश्वासन भाजप नेत्यांनी तसेच मंत्र्यांनी द्यावे, असा खोचक टोला प्रियांका चतुर्वेदी यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा : SHRIKANT SHINDE : खासदार श्रीकांत शिंदेंना भरसभेत दाखवले काळे झेंडे! परभणीतील घटना

- Advertisement -

अद्यापही रोकड मोजण्याचे काम सुरूच

साहू यांच्याकडील रक्कम मोजण्याची काम आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. यापैकी अद्यापही काही रक्कम मोजणे बाकी असल्याने सुरुवातीला बँक कर्मचाऱ्यांसह 30 हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. पण, आता मोजणी त्वरीत पूर्ण करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने सुमारे 40 लहान-मोठ्या मशीन्स तसेच आणखी कर्मचारी मागवले आहेत. अद्यापही साहू यांच्याकडील रोकड मोजण्याचे काम सुरूच आहे.

हेही वाचा : Winter Session : शेतकरी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वादळी चर्चा? अधिवेशनाचा दुसरा आठवडा गाजणार

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम जप्त

काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 300 कोटींहून अधिक रोकड जप्त केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, मला खूप आश्चर्य वाटत आहे, स्वातंत्र्यानंतर एवढी मोठी रोकड कधीच जप्त झाली नाही. या भ्रष्टाचारावर संपूर्ण इंडिया आघाडी गप्प आहे. काँग्रेसचे मौन समजण्यासारखे आहे कारण भ्रष्टाचार हा त्यांचा स्वभाव आहे. पण TMC, JDU, RJD, DMK आणि SP सुद्धा गप्प आहेत. आता मला समजले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तपास यंत्रणांनाचा गैरवापर केल्या जातोय ही मोहीम का उघडण्यात आली होती. कारण, यांच्या भ्रष्टाचाराचे सर्व प्रकरणे पुढे येतील अशी त्यांना भीती आहे म्हणून हे सगळेजण मोदींना टार्गेट करण्यासाठी तपास यंत्रणाच्या गैरवापराचा आरोप करत असल्याची प्रतक्रिया अमित शहा यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -