घरमहाराष्ट्रशिंदेंच्या सभेतील गर्दी पाहून उदय सामतांना होतोय बाळासाहेबांच्या सभांचा भास, म्हणाले...

शिंदेंच्या सभेतील गर्दी पाहून उदय सामतांना होतोय बाळासाहेबांच्या सभांचा भास, म्हणाले…

Subscribe

शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय वाद आता चांगलाच विकोपाला पोहचला आहे. यात नवरात्रोत्सवानंतर आता दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट आमने सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून आमचाच दसरा मेळावा खरा असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शिंदे गटासह आता शिवसेनेनेही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. यात मुंबईत शिंदे गटाने शिवसेनेच्या संपर्क अभियान सुरु केले आहे. याच संपर्क अभियानात बोलताना उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. एकूणचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला होणारी गर्दी पाहून उदय सामंत यांना बाळासाहेब ठाकरेंच्या सभांचा भास होत आहे.

यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या सभेला जी गर्दी होते, ती स्वर्गीय बाळासाहेबांच्या सभेसारखी असते. म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय असा भास होतो, कारण एवढी लाखो लोकांची गर्दी सभांना होत आहे. असे म्हणत सामंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेची तुलना बाळासाहेबांच्या सभेशी केली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवरही अप्रत्यक्ष टीका केली आहे. आमच्याकडे दापोलीला काहीजण सभेसाठी गेले होते, एखादा कोपरा पाहायचा, राष्ट्रवादीचे लोकं भगवा झेंडा घेऊन लोकं जमवायचे आणि आम्हाला शिव्या घालायच्या, असं म्हणत सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या सभेवर जहरी टीका केली आहे.

- Advertisement -

दसऱ्या संदर्भात आमची व्यवस्थित चर्चा झाली. दसरा मेळाव्याला एकनाथ शिंदेंचे विचार ऐकण्यासाठी आणि वंदनीय बाळासाहेबांचे खरे समर्थन करण्यासाठी मुंबईहून विक्रमी लोकं उपस्थित राहतील. असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

यावेळी सामंतांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक करत म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. अतिशय वेगाने ते काम करतात. 22 तारखेला आमची बैठक होती आणि 28 तारखेला भारतरत्न लता मंगेशकर यांच्या संकल्पनेतील पंडित दिनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी 100 कोटी रुपये मंजूर केले, अडीच वर्षांपूर्वी जी संकल्पना आमच्यासमोर आली ती संकल्पना एकनाथ शिंदेंनी केवळ 2.5 महिन्यात प्रत्यक्षात उतरवली. म्हणून बुलेट ट्रेनपेक्षाही त्यांचा फास्ट स्पीड आहे. असं शब्दात उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

मुंबईत शिवसेनेचे संपर्क अभियान सुरु आहे. त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिली आहे. आज दोन मेळावे झाले दोन्ही मेळावे फार मोठे झाले आहेत. सभा घेणे हा लोकशाहीचा अधिकार आहे, शेवटी कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सभेला येणाऱ्या लोकांचीही जबाबदारी आहे. असही सामंत यावेळी म्हणाले.

दरम्यान अंबादास दानवेंनी ठाण्यात देवीचे नुकतेच दर्शन घेतले. यावेळी महिशासूर मर्दिनीकडे 40 महिशासुरांचे मर्दन करण्याची प्रार्थना केल्याचे म्हटले होते. ज्यावर सामंत यांनी उत्तर देत म्हटले की, मला काही फरक पडत नाही असे अनेक अंबादास दानवे झेपवले आहेत. दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून देवीकडे प्रार्थना करणाऱ्या माणसाकडे देव बघत असतो की हा किती वाईट आहे. देव त्याचेच वाईट करतो. दानवेंनी त्यांचं विधान परिषदेचे पद जितकी वर्ष आहे ते सांभाळावं त्यांचे विचार त्यांनी पोहचवावे. देवी त्यांना चांगली बुद्धी देवो हीच माझी प्रार्थना असल्याचा उपरोधिक टोला सामंतांनी लगावला आहे.


भारतातील ब्लॅक कोकेन सप्लायचे पहिले रॅकेट उघड; एनसीबीने मुंबईतून जप्त केला 3 कोटींचा साठा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -