घरताज्या घडामोडीराष्ट्रपतीपदासाठी राजकीय उंची लागते, सदावर्तेंची पवारांवर टीका

राष्ट्रपतीपदासाठी राजकीय उंची लागते, सदावर्तेंची पवारांवर टीका

Subscribe

राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट राजकीय उंची लागते, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे राष्ट्रपती पदासाठी नाव चर्चेत आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विचार केला जातोय. मात्र, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांना विरोध केला आहे. राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट राजकीय उंची लागते, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. (It takes political stature for the post of President, Sadavarten criticizes Pawar)

हेही वाचा – गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली – गुणरत्न सदावर्ते

- Advertisement -

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसं होती. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार, ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे कुठली उंची आहे? कारण, राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट उंची लागते.”

ते पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादीचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राज्य सरकार अन्यायी आहे. राज्यात महिला, कष्टकऱ्यांवर अत्याचार होत आहे. या सरकारला मत का देऊ नये, हे पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागरण करणार आहे,” असंही ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – वकील गुणरत्न सदावर्तेंची एसटी बँकेच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याची घोषणा

राजकारणात येणार का याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, “भारताच्या संविधानात मोठी ताकद आहे. कष्टकऱ्यांसाठी न्यायालयात लढणे मला जास्त उपयोगी वाटते. राजकारणाला अस्पृश्य मानत नाही. त्यामुळे राजकारणात कधी जाणार, ते योग्य वेळी जाहीर करेन,” असेही सदावर्ते यांनी स्पष्ट केले.

ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले?

ओबीसी जनगणना घरोघरी जाऊन सर्वेक्षणाद्वारे होत नसल्याची धक्कादायक बाब कळली आहे. केवळ टेबलवर बसून आडनावावरून मोघमपणे जनगणना केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला आपला पाठिंबा आहे. मुंबईतून त्याला बळ देऊ, असे देखील त्यांनी सांगितले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -