घरमहाराष्ट्रत्यांनीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा छळ केला, सावंतांचा कदमांवर पलटवार

त्यांनीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा छळ केला, सावंतांचा कदमांवर पलटवार

Subscribe

शिवसेनेसाठी आम्ही 52 वर्ष काम केल्याचं सांगत रामदास कदमांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर आता अरविंद सावंतांनी त्यालाच प्रत्युत्तर दिलंय

मुंबईः शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीनंतर मोठा वादंग माजलाय. रामदास कदमांनी मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आता त्यालाच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. उठसूट जो पण येतोय तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सल्ला देत सुटलाय. बंडखोरांना सल्ला देण्याचा अधिकार कोणी दिला म्हणत अरविंद सावंतांनी रामदास कदमांवर टीकास्त्र डागलं.

अरविंद सावंत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. अडचणीच्या काळात सर्व जण आपला स्वार्थ साधत आहेत. खरं तर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा छळ केल्याचा पलटवार अरविंद सावंत यांनी केलाय. शिवसेनेसाठी आम्ही 52 वर्ष काम केल्याचं सांगत रामदास कदमांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर आता अरविंद सावंतांनी त्यालाच प्रत्युत्तर दिलंय.

- Advertisement -

रामदास कदम जेव्हा कोकणातील खेडमधून पराभूत झाले, तेव्हाही त्यांनी असाच ब्लॅकमेल करण्याचा प्रकार केला होता. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीशी संधान बांधलं होतं. त्यांचं राजकीय पुनर्वसन म्हणून त्यांना विधान परिषदेवर पाठवले, रामदास कदमांना मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर पाठवलं, दुसरीकडे त्यांच्या मुलाला खेडमधून संधी देण्यात आली. हे सगळं उद्धव ठाकरेंनीच केलं होतं.

स्वतःच्या मुलाला उमेदवारी देण्यापेक्षा त्यांनी एका शिवसैनिकासाठी पाठपुरावा केला पाहिजे होता. तिथे शिवसैनिकाला उभे केले पाहिजे होते. पण तुम्हाला मुलगाच पाहिजे. असा स्वार्थ साधत असताना तुमचा परमार्थ कुठे जातो, असा टोलाही अरविंद सावंतांनी लगावलाय. आता आम्हाला सल्ला देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, तुम्ही उद्धव ठाकरेंना जसे छळताय, ब्लॅकमेल करताय, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय. कोण आहेत ते, कोणासोबत जायंच हे त्यांना तरी माहीत आहे का, त्यांची ओळख काय, हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे, कोणाकडे चाललेत तुम्ही, हे सर्व घटनेच्या विरोधात चाललं असल्याचंही त्यांनी सांगितलंय. हा जो गट फुटलाय त्याला दुसऱ्या कोणत्या तरी पक्षा जावे लागणार आहे. जाताय का मग भाजपात, का कुठल्या दुसऱ्या पक्षात जाताय ते आधी ठरवा, उद्धव ठाकरेंनी स्वत: चा स्वाभिमान सोडून कोणाचे पाय धरायचे अशी तुमची अपेक्षा आहे. तुम्ही या आपण बोलू आणि निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरेंनी आधीच म्हटलं आहे. मग तुम्ही आलात का, जर तुम्हाला एवढा अधिकार वाटतो तर त्यांचे कान ओढायला हवे होते, त्यांचे कान ओढून उद्धव ठाकरेंसमोर आणायचं होते, पण तसं न करता उद्धवजींनाच त्यांच्यासमोर झुकायला लावलं, असंही ते म्हणालेत.

- Advertisement -

हेही वाचाः उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका, शिंदे गटातील राहुल शेवाळेंना लोकसभेतील शिवसेना नेते म्हणून मान्यता

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -