घरठाणेशो बंद पाडल्याने प्रेक्षकानेच केली तक्रार; आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

शो बंद पाडल्याने प्रेक्षकानेच केली तक्रार; आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Subscribe

ठाणे – हर हर महादेव या चित्रपटाचा शो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. विवियाना मॉलमधील शो प्रेक्षकांना दमदाटी करून बंद पाडण्यात आला. याप्रकरणी डॉ.जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – मावळा गोरापान, चिकना कधी होता? हर हर महादेव चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा सवाल

- Advertisement -

तक्रारदार परीक्षित धुर्वे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत, ते आणि त्यांची पत्नी हर हर महादेव हा सिनेमा पाहण्यासाठी विवियाना मॉलमध्ये सिनेमागृहात गेले होते. सिनेमा चालू असताना माजी मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते तो चित्रपट बंद पाडण्याच्या उद्देशाने सिनेमागृहात आले. त्यांनी “चित्रपटामध्ये चुकीचे दृष्य दाखवले जात असल्याने हा चित्रपट बंद करा” असे बोलून चित्रपट बंद पाडला. त्यावेळी चित्रपट पहाणाऱ्यापैकी कोणीतरी इसमाने “असे कसे कोणीही एैरा गैरा येईल व चित्रपट बंद पाडेल” असे बोलला. त्याचा राग मनात धरून चित्रपट बंद पाडण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते प्रेक्षकांच्या अंगावर धावून आले. तेव्हा तक्रारदार व त्यांची पत्नी हे प्रथम असल्याने जमावातील ८ ते १० लोकांना त्यांना व त्यांची पत्नी अशा दोघांना धक्काबुक्की केली. यामुळे जितेंद्र आव्हाडांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा ‘हर हर महादेव’वरून राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने; राज ठाकरेंचा उल्लेख करत दिग्दर्शकही संतापले

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड करू नका. इतिहासाचं विद्रूपीकरण करू नका, असं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी यानिमित्ताने केले आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सिनेनिर्मित्यांना इशारा दिला होता. ऐतिहासिक चित्रपट काढताना समिती नेमण्याचा सल्ला छत्रपतींनी दिला आहे. त्यानंतरच, हा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे येत्या काळात हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात हे दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे महत्त्वाचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -