घरमहाराष्ट्रराज्यात लसीच्या तुटवड्याने केंद्र बंद करण्याची आपत्ती !

राज्यात लसीच्या तुटवड्याने केंद्र बंद करण्याची आपत्ती !

Subscribe

राज्यात पुणे, सांगली, सातारा, पनवेल पाठोपाठ मुंबईतही लसींचा मोठा तुटवडा जाणवू लागल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्याची आपत्ती ओढवली आहे. एका दिवसात जवळपास ३० केंद्रे बंद झाल्यामुळे आता जेमतेम दीड -दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक राहिला असून त्यानंतर मुंबईत संपूर्ण लसीकरण ठप्प होणार आहे. मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे लसीच्या तुटवड्यामुळे खासगी २६ केंद्रे आणि पालिकेचे राजावाडी, कांदिवली शताब्दी, माहीम प्रसूतिगृह आणि शक्यन रुग्णालय ही चार केंद्रे अशी एकूण ३० केंद्रे एकाच दिवसांत बंद पडली आहेत.

मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे लसीच्या तुटवड्यामुळे खासगी २६ केंद्रे आणि पालिकेचे राजावाडी, कांदिवली शताब्दी, माहीम प्रसूतिगृह आणि शक्यन रुग्णालय ही चार केंद्रे अशी एकूण ३० केंद्रे एकाच दिवसांत बंद पडली आहेत. आता जेमतेम दीड – दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक राहिला असून त्यानंतर मुंबईत संपूर्ण लसीकरण ठप्प होणार आहे.लसीच्या तुटवड्यामुळे सत्ताधारी शिवसेना व विरोधी भाजपात राजकारण सुरू झाले आहे.

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. शहर व उपनगरे येथील ११८ लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत एकूण१५ लाख २३ हजार ८१८ लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. मात्र तीन महिने पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजे १६ जानेवारी ते ८ एप्रिल या कालावधीत लसीकरणाचा साठा संपत आला आहे.

- Advertisement -

राज्यातही पुणे, सांगली व सातारा येथील लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. आता पुढील दोन दिवसांत तिचं परिस्थिती मुंबईत बघायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबईत ११८ ठिकाणी लसीकरण केले जाते. त्यापैकी मुंबई महापालिकेच्या ३३, राज्य आणि केंद्र सरकारच्या १४ आणि खासगी रुग्णालयात ७१ केंद्रांवर लसीकरण केले जाते. याच ७१ खासगी केंद्रांपैकी २६ लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेचे राजावाडी, सायन, कांदिवली शताब्दी, माहीम प्रसूतिगृह अशी चार केंद्रे एकूण ३० केंद्रे बंद पडली आहेत. तर उद्या व परवापर्यंत उर्वरित लसीकरण केंद्रे लसीच्या तुटवड्यामुळे बंद होणार आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे तर राज्याने केंद्र सरकारकडे लसीचा पुरवठा करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.मात्र मुंबईला १५ एप्रिलपर्यंत लसीचा साठा मिळणार असल्याने तोपर्यंत लसीकरण केंद्र बंद स्थितीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुंबईला लसीचा जास्तीत जास्त साठा मिळावा, यासाठी मुंबई महापालिका राज्याकडे व केंद्राकडे सतत पाठपुरावा करीत असल्याचे, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

लस संपण्याच्या भीतीने नागरिकांची सेंटरवर गर्दी

राज्यामध्ये सहा ते सात दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. त्यापाठोपाठ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईत लसीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून मुंबईतील बहुतांश लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी प्रचंड गर्दी करण्यास सुरुवात केली. मुंबईतील नायर रुग्णालय, बीकेसी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडालेली पाहायला मिळाली.

मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 1 ते रात्री 9 अशा दोन सत्रांमध्ये लसीकरण सुरू आहे. दिवसभरात तब्बल साडेपाच हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र, राज्यात लसींचा तुटवडा होणार असल्याचे बुधवारी आरोग्य मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आल्याने गुरुवारी सकाळीच मुंबईतील सर्वच लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली. सकाळी साडेसहा वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लावल्या. लसीकरण केंद्रात बसण्याची व्यवस्था अपुरी पडल्याने नागरिकांना केंद्राबाहेर भर उन्हात रांगा लावाव्या लागल्या. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील लसींचा साठा संपल्याने नागरिकांनी जवळच असलेल्या नायर रुग्णालयाकडे धाव घेतल्याने रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी प्रचंड गर्दी निर्माण झाली होती.

ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा रक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्याचप्रमाणे मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी कोरोना सेंटरमध्ये नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे उन्हामध्ये रांगा लावाव्या लागल्या होत्या. बीकेसी केंद्रामध्ये लसीकरणासाठी झालेल्या गर्दीमुळे गुरुवारच्या दिवसाचे लसीकरण पूर्ण झाले. मात्र, अशीच गर्दी पुढील काही दिवस राहिली तर तुटवडा जाणवण्याची शक्यता बीकेसी कोरोना केंद्राचे प्रमुख डॉक्टर राजेश ढेरे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे मुंबईच्या नेस्को गोरेगाव लसीकरण केंद्रावरही लसीचा तुटवडा असून बुधवारी लसीचे 1300 डोस उपलब्ध झाले होते. या केंद्रावर दररोज साडेतीन हजार लोकांना लसीकरण केले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -