घरठाणेप्रशासनला विरोध करण्याचे काम माझे असेल, अनधिकृत बांधकामावरून आव्हाडांचा थेट इशारा

प्रशासनला विरोध करण्याचे काम माझे असेल, अनधिकृत बांधकामावरून आव्हाडांचा थेट इशारा

Subscribe

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून कायमच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वाद पाहायला मिळत आहे. आता या दोन्ही गटांत पुन्हा एकदा नव्या कारणामुळे वादाला सुरुवात झाली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत थेट ठाणे प्रशासनालाच इशारा दिला आहे.

हेही वाचा – ‘हे’ थेट भाजपात सामील का होत नाहीत? ठाकरे गटाची शिंदे गटावर जहरी टीका

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांचा जमावाने 2 नोव्हेंबर 2023 रोजी मुंब्रा येथील शाखेत घुसून ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाला बाहेर काढले. तसेच, शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावला. त्यानंतर शाखेवर बुलडोझर चालवून ती भुईसपाट केली. तिथे शाखेची नवी वास्तू उभी करणार असल्या शिंदे गटाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

त्यातच शनिवारी उद्धव ठाकरे यांनी मुंब्रा येथे जाऊन शाखेची पाहाणी करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शनिवारी तिथे पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. ते मुंब्र्यात गेले असता त्यांना शाखास्थळी जाण्यास पोलिसांनी रोखले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी संवाद साधला. पण पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पुन्हा एकदा वाहनातच बसण्याची विनंती केली. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.

हेही वाचा – IND Vs NED: नेदरलँड्सविरुद्ध 9 खेळाडूंनी का केली गोलंदाजी? रोहित शर्माने सांगितलं कारण…

यापार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट करत, वादग्रस्त जागी उभ्या राहात असलेल्या नव्या शाखेचे बांधकाम अवैध असल्याचा दावा केला होता. तोच धागा पकडून त्यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. गेले 8 दिवस चर्चेत असलेल्या मुंब्रा परिसरातील शाखेचे काम पोलीस आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन मिळून थांबवतील, असे मला वाटले होते. पण काम थांबवणे तर सोडाच काम दुप्पट वेगाने आजही सुरू आहे, असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ठाणे महापालिका आणि ठाणे पोलिसांनी आता ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांना परवानगी द्यावी. तुमच्याकडे येण्याची काहीही गरज नाही. ज्याला वाट्टेल तिथे त्याने बांधकाम करावे. त्याला कोणीही अडवणार नाही. यापुढे मुंब्रा परिसरातील कुठल्याही इमारतीवर कारवाई करण्यासाठी प्रशासन गेल्यास त्यांना विरोध करण्याचे काम माझे असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -