घरताज्या घडामोडीअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मनात जे आहे तेच होईल - उदय सामंत

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मनात जे आहे तेच होईल – उदय सामंत

Subscribe

कोरोना दरम्यान रखडलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे आहे तेच होईल, असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांना पुढे येणाऱ्या समस्या आणि अडचणीवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता ते संभ्रमामध्ये आहेत. माननीय राज्यपाल महोदयांनी लिहिले जे पत्र आहे. त्यामुळे देखील संभ्रम निर्माण झाला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. मी देखील याच भूमिकेवर ठाम आहे. म्हणून पुन्हा एकदा मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेबाबत जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे तोच निर्णय होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण घरात सुरक्षित राहा, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

यावर आशिष शेलार काय म्हणाले?

विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे याबाबत मी सहमत आहे. पण अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मुळमुळीत उत्तर का देताय असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. सरकाराने घोषणा केली, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं तर आता निर्णय घ्याना. मनात असेल ते होईल, तुम्हाला वाटेल ते होईल. पहिला निर्णय काय ते सांगा. आता विद्यार्थ्यांच्या जीवावर आलं आहे होणार की नाही होणार?, होणार असेल तर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचं काय होणार?, एटीकेटीच्यांना नापास कसं काय करणार?, ४० टक्के विद्यार्थ्यांना रस्त्यावर का सोडणार?, १०-१२ टक्के विद्यार्थी आपलं पुढचं आयुष्य घडवू इच्छितात, त्यांच्याबाबतीत तुम्ही काय निर्णय घेतलाय?, त्या परीक्षा कशा होणार? स्पष्टता द्या. १५ दिवसांच्या वर काळ गेला आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नका, असं आशिष शेलार एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.


हेही वाचा – कोरोनाचा महिलांवर आणि मुलांवर होऊ शकतो अप्रत्यक्ष परिणाम; WHOचा इशारा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -