घर महाराष्ट्र जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यासाठी काही वेळ लागणार - अर्जुन खोतकर

जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यासाठी काही वेळ लागणार – अर्जुन खोतकर

Subscribe

जालना : मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यासाठी काही वेळ लागणार आहे, असे शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर म्हणाले आहे. राज्य सरकार जोपर्यंत त्यांच्या जीआरमध्ये दुरुस्ती करत नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे उद्धगार मनोज जरांगेंनी काढले आहे. राज्य सरकारच्या वतीने अर्जुन खोतकर हे मनोज जरांगेंशी चर्चा करण्यासाठी जालन्यात गेले होते.

यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले, “मनोज जरांगेंनी ज्या काही बाबी सांगितल्या आहेत. त्या सर्व प्रक्रियेचा भाग असून ही प्रक्रिया पार पडण्यासाठी शासनाला काही वेळ लागणार आहे आणि जरांगेंनी तो वेळ द्यावा. यासाठी मी येथे आलेलो आहे”, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने वेळ मागितला- अर्जुन खोतकर

खोतकरांनंतर जरांगे म्हणाले…

यावर मनोज जरांगे म्हणाले, “राज्य सरकारने 7 सप्टेंबरला काढलेल्या जीआरमध्ये दुरुस्ती केली नाही. जोपर्यंत जीआरमध्ये दुरुस्ती होणारन नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. राज्य सरकारच्या जीआरमध्ये फक्त किरकोळ दुरूस्ती राहिल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जालन्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, तरी जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले…

खोतकर लिफाफा घेऊन जरांगेच्या भेटीला

अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लिफाफा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील आणि आंदोलक जेवढे या आंदोलनात सहभागी आहेत तितकाच मी आहे. उपोषणकर्त्यांची मागणी मी प्रामाणिकपणे सरकारपर्यंत आतापर्यंत पोहोचवली आहे. काल, संध्याकाळी मनोज पाटील यांच्या सुचनेप्रमाणे रात्री मुंबईत दाखल झालो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाधिवक्ता अशी रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. या बैठकीनंतर शासनानं जो जीआर जो सुधारित काढला आहे. तो थेट मनोज जरांगे पाटील यांच्या हातात जावा, अशी मला सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिली होती आणि त्याप्रमाणे मी तो सोपवला असल्याचं खोतकर म्हणाले.

- Advertisment -