घर उत्तर महाराष्ट्र तिढा सुटला! उद्यापासून कांदा लिलाव पूर्ववत, 'या' मागण्यांबाबतही केंद्रात पाठपुरावा

तिढा सुटला! उद्यापासून कांदा लिलाव पूर्ववत, ‘या’ मागण्यांबाबतही केंद्रात पाठपुरावा

Subscribe

नाशिक : कांदा निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्हयात ठप्प असलेले कांदा लिलाव गुरूवार (दि.२४) रोजी पूर्ववत होणार आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यापारी संघटनांनी हा निर्णय जाहिर केला. या निर्णयामुळे बाजारपेठा पूर्ववत होऊन चांगली आवक होण्याचा तसेच चांगल्या दराचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Good news Revocation of onion auction from tomorrow,  Successful mediation by union state minister Dr. Bharti Pawar, assurance of follow-up with Center regarding export duty)

गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळाले. नाशिकसह अनेक भागांत शेतकर्‍यांची रास्ता रोकोसह आंदोलने झाली. त्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यांनतर देखील अनेक भागांत आंदोलने सुरूच आहेत. नाशिक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या निर्यात शुल्क वाढीच्या धोरणामुळे चार दिवसांपासून लिलाव ठप्प आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : शेतकर्‍यांना चांगला भाव मिळतो तेव्हा राहुल गांधी सभागत्याग का करतात?; डॉ. भारती पवारांचा सवाल

अशातच केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत या प्रश्नावर मध्यस्थी करत प्रश्न सोडविला आहे. त्यानुसार उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या खुल्या होणार असून कांदा लिलावाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही कांदा व्यापारी बाहेरगावी असल्यामुळे गुरूवारपासून लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरु होणार आहे. तर निफाडसह विंचूर उपबाजार आवारात आजपासून लिलाव सुरु झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

या बैठकीस आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, दिल्ली येथील नाफेड चे व्यवस्थापकीय संचालक रितेश चव्हाण, कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक एस. वाय. पुरी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) फैयाज मुलाणी, नाफेड चे प्रादेशिक व्यवस्थापक निखिल पारडे, कृषी विभागीय उपसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासह विविध शेतकरी संघटनाचे व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : कांदा पेटला, नाशिक-पुणे महामार्ग केला ठप्प; राष्ट्रवादीने आक्रमक होत केला चक्काजाम

- Advertisment -