घर महाराष्ट्र कथित 'गुरुजीं'ना ज्ञानामृत पाजले हे बरे झाले, फडणवीसांचे कौतुक करत रोहित पवारांचा...

कथित ‘गुरुजीं’ना ज्ञानामृत पाजले हे बरे झाले, फडणवीसांचे कौतुक करत रोहित पवारांचा भिडे गुरुजींवर निशाणा

Subscribe

मुंबई : एकापाठोपाठ एक वादग्रस्त करणारे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे हे कायम विरोधी पक्षाच्या रडारवर असतात. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना कथित ‘गुरुजीं’ना ज्ञानामृत पाजले हे बरे झाले, असे सांगत भिडे गुरुजींवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Face to face : तुम्हा ‘तिघांचे’ किस्से लोकांना ज्ञात आहेत, ठाकरे गटाचे फडणवीस यांना प्रत्युत्तर

- Advertisement -

भिडे गुरुजी यांनी अलीकडेच महात्मा गांधी, राजाराम मोहन रॉय, जोतिबा फुले आणि शिर्डीच्या साईबाबा यांच्याबद्दल अनुद्गार काढले होते. साईबाबांचा आदर करा, पण ते खरंच त्यासाठी पात्र आहेत की नाही, हे तपासून पाहावे. हिंदूंनी सर्वप्रथम त्यांच्या घरातून साईबाबांचे चित्र आणि मूर्ती काढून टाकल्या पाहिजेत. मी विशिष्ट मानसिकतेचा नाही. हे मी जबाबदारीने सांगत आहे. साईबाबांना अजिबात देव मानू नये, असा दावा भिडे यांनी केला होता.

- Advertisement -

संभाजी भिडे यांनी सातत्याने केलेल्या वादग्रस्त विधानांबाबत आक्रमक होत विरोधकांनी सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. अलीकडेच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांच्याबाबत निवेदन सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा ‘भिडे गुरुजी’ असा उल्लेख केला होता. यावर विरोधकांनी आक्षेप घेचा, संभाजी भिडे आम्हाला गुरूजी वाटतात, काय अडचण आहे? असा सवाल फडणवीस यांनी केला होता.

तर, काल, गुरुवारी शिर्डीमध्ये शासन आपल्या गावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतील साईबाबांच्या मंदिराला भेट दिली. त्याबद्दल त्यांनी ट्वीट ही केले आहे. मला श्री साईबाबांची पूजा करण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी सर्वांचे स्वागत केले, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ‘कॅगचे ताशेरे म्हणजे भ्रष्टाचार नाही’; राऊतांच्या आरोपावरून बावनकुळेंची सारवासारव

हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांचे कौतुक करत भिडे गुरुजींवर शरसंधान केले आहे. श्री साईबाबा हे आमचे श्रद्धास्थान आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्ही आपल्याच कथित ‘गुरुजीं’ना ज्ञानामृत पाजले, हे बरे झाले. याबद्दल आपले खरंच आभार, असा टोला त्यांनी ट्विटरवरून लगावला आहे. आता इतर थोर व्यक्ती आणि संतांविषयी चुकीची वक्तव्य करणाऱ्यांविरोधातही कारवाई करून आपले गृहमंत्र्यांचे मनगट आहे, हेही दाखवून द्यावे, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे.

- Advertisment -