घरदेश-विदेशमोदी सरकारची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा; जे. पी. नड्डांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मोदी सरकारची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा; जे. पी. नड्डांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Subscribe

 

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. या योजना सर्वसामान्यांसाठी फलदायी ठरल्या आहेत. मोदी सरकारने केलेली ही कामे सर्वसमान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना केले.

- Advertisement -

नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुणे येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले. मोदींमुळे जगात भारताची मान उंचावली आहे. आपण जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनलो आहोत. कोरोना संकटातही मोदी यांच्या नियोजनामुळे आपली अर्थव्यवस्था भक्कम राहिली. नेपाळ, श्रीलंका यांना आपण मदतही केली. हे सर्व जनतेपर्यंत पोहोचायला हवे, असेही नड्डा यांनी सांगितले.

भाषणात नड्डा यांनी कॉंग्रेसवरही निशाणा साधला. कॉंग्रेसने दळणवळणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. मोदींमुळे चांगल्या रस्त्यांचे जाळे देशभर विणले गेले. विमानतळांची संख्या वाढली. वंदे भारत सुरु केली. त्यामुळे भाजप हा केवळ सत्तेचे राजकारण करणारा पक्ष नाही. तर सर्वसामान्यांचा पक्ष आहे, असा दावाही नड्डा यांनी यावेळी केला.

- Advertisement -

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसच्या कर्नाटक विजयावर भाष्य केले. कर्नाटक पॅर्टन देशात चालणार नाही. देशात फक्त मोदी पॅर्टन चालणार आहे. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपला २८ पैकी २५ जागा मिळतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आपली लोकसेभेची लढाई नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांची नाही किंवा गावाची नाही. आपली लढाई बुथची आहे. बुथ सक्षम असेल तर निवडणूक जिंकणे सहज शक्य आहे. सर्वसामान्य जनता हिच आपली शक्ती आहे. हिच मोदीजींची शक्ती आहे.  महाराष्ट्रात कर्नाटक पॅर्टन चालणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांचा मावळा भाजपला नक्की वियय मिळवून देईल, असा विश्वास फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

फडणवीस म्हणाले, पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. येणारे सहा महिने आणि त्या पुढचे सहा महिने महत्त्वाचे आहेत. कोणतीही लालसा मनात ठेवू नका. पद मागू नका. समिती मागू नका. मी घर आणि पद सोडायला तयार आहे. पार्टीने मला काय दिलं यापेक्षी मी पार्टीला काय दिलं याचा विचार करुन कामाला लागा. विजयानंतर प्रत्येकाच्या त्यागाचाच विचार केला जाणार आहे. सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा. सर्वसामान्यांची कामे करा. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल काळजी करु नका, असेही फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -