घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं; नड्डांची सूचना

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं; नड्डांची सूचना

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केल्यानंतर राज्यातील जनतेसह भाजपला देखील मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. भाजपकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी खात्री सगळ्यांनाच वाटत होती. मात्र, फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची मोठी घोषणा करत सामान्य जनतेसह केंद्रातील भाजप सरकारला देखील धक्का दिला आहे. कारण देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडाळात सामील होऊन उपमुख्यमंत्री व्हावं, अशी सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिली आहे.

जे.पी. नड्डा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी, असे विधान नड्डा यांनी केलं आहे.

- Advertisement -

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनवण्याचा आग्रह केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे फडणवीसांनी मोठे मन दाखवत मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगत आपण बाहेर राहून सरकारला साथ देणार असल्याचे सांगितले आहे. परंतु केंद्राच्या आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनसार फडणवीस आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातील जनतेचा विकास व्हावा आणि कल्याण व्हावे, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय पथकाने घेतला आहे. सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदचा पदभार स्वीकारावा असे देखील जे.पी. नड्डा यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : देवेंद्र फडणवीस बनणार उपमुख्यमंत्री, भाजपा नेतृत्वाची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -