अवघा रंग एक झाला! तुकोबांच्या पालखीचे पहिले अश्वरिंग पडले पार

पालखी सोहळ्यातील बेलवाडी गावामधील हे पहिलेच रिंगण आहे

Jagadguru Sant Shrestha Tukaram Mahara first ringan sohala was held at belwadi

कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा प्रथमच आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा पार पडला. यात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल अश्वरिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पार पडले. यावेळी नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात, अश्व धावता रिंगण, नाचे विठू काळजात!! अशा भावना अश्व रिंगणाचा सोहळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात होत्या.

टाळ मृदूंगाच्या गजरात आणि विठू नामाच्या जयघोषात लहान थोरांनी मोठ्या उत्साहाने या रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला, यावेळी झेंडेकरी नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी आणि विणेकरी यांनी मानाच्या पालखीबरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फेऱ्या घेतल्या. या पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी देखील हजेरी लावली होती,

या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडल. सणसर येथील मुक्कामानंतर तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगणासाठी आज बेलवाडी येथे ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात आगमन झाले, आज सकाळी सात वाजल्यापासून रिंगण स्थळावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती, दोन वर्ष कोरोनामुळे पालखी सोहळा बंद असल्याने मात्र यावर्षी रिंगण सोहळा झाल्याने रिंगणातील वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबाल वृद्धांचे भान हरपले. देहभान हरपून विठुनामाचा ज प करीत तुकाराम महाराजांचा जयघोष करीत वारकऱ्यांनी पहिले रिंगण केले. या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमले. हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी आणि अश्वांच्या चरणाखालील रज भाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. बेलवाडीमध्ये तुकारामाच्या पालखीचं चौथा मुक्काम आहे. या रिंगण सोहळ्यादरम्यान महिला आणि पुरुषांनी देखील फुगड्यांचा फेर धरले. यावेळी कुणी टाळ, मृदुंग आणि विणेच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला.

पालखी सोहळ्यातील बेलवाडी गावामधील हे पहिलेच रिंगण आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वैशिष्ट्य असे की, मेंढ्याचे रिंगण पार पडले. पालखी सोहळ्यातील मेंढ्याच्या रिंगणातील ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली जात आहे. मेंढपाळांकडून मेंढ्याना रोगराईपासून दूर ठेवत असे म्हणत साकडे घालण्यासाठी सुरु केली परंपरा आजही तितक्या उत्साहात सुरु आहे.


फडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला – एकनाथ शिंदे