घरताज्या घडामोडीभारतीय रेल्वेत जगजीवन राम हॉस्पिटलने मारली बाजी; ७८ टक्के रिकव्हरी रेट!

भारतीय रेल्वेत जगजीवन राम हॉस्पिटलने मारली बाजी; ७८ टक्के रिकव्हरी रेट!

Subscribe

बाबू जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ७८ टक्के असून भारतीय रेल्वेच्या सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या बाबू जगजीवन राम हॉस्पिटलची शंभर टक्के कोविड हॉस्पिटल म्हणून घोषणा केली होती. या हॉस्पिटलने गेल्या चार महिन्यांत भारतीय रेल्वेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. या हॉस्पिटलने आतापर्यंत हजारो कोरोनाबाधित कर्मचार्‍यांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज दिला आहे. बाबू जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ७८ टक्के असून भारतीय रेल्वेच्या सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार अधिकाधिक कोविड हॉस्पिटल्स उभारण्यावर भर देत आहे. कोरोना काळातही रेल्वेची मालवाहतूक सुरु होती. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना वेळत उपचार मिळावे, याकरिता भारतीय रेल्वेने काही रेल्वेच्या हॉस्पिटल्सला शंभर टक्के कोविड हॉस्पिटल चा दर्जा दिला होता. भारतीय रेल्वेचे प्रथम कोविड हॉस्पिटल हे पश्चिम रेल्वेचे बाबू जगजीवन राम हॉस्पिटल होते. आतापर्यंत या हॉस्पिटलमध्ये कोरोना सदृश लक्षण असलेल्या आणि कोरोनाबाधित अशा १ हजार ६३८ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये १ हजार २५३ 3 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आतापर्यंत बाबू जगजीवन राम हॉस्पिटलमधून १ हजार ५०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील फक्त ९ रुग्णांना इतर हॉस्पिटल्समध्ये हलविण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या एकूण रुग्णांपैकी ५४  टक्के रुग्णाचे वय हे ५० पेक्षा अधिक होते. ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी, निवृत्त रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांचा समावेश होता. आतापर्यंत कोरोनामुळे ११८ रुग्णांचा मुत्यू झालेला आहे.

- Advertisement -

हजारव्या कोरोनाच्या रुग्णाला डिस्चार्ज

पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये दरदिवशी ९ ते १० रुग्ण दाखल होतात. सध्या या हॉस्पिटलमध्ये १४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात १३०  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित ११ रुग्णांचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी आहे. मात्र २५  जुलैला जगजीवन राम हॉस्टिलमध्ये १ हजारव्या कोरोनाच्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -