घरमहाराष्ट्रमुंबईत 'जेलभरो आंदोलनाची' सुरूवात

मुंबईत ‘जेलभरो आंदोलनाची’ सुरूवात

Subscribe

'जेलभरो आंदोलन' हे कष्टकरी शेतकरी, विद्यार्थी आणि महिला कामगारांना त्याच्या हक्काच्या लढाईसाठी करण्यात आले आहे. हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख अॅड. अजय तापकीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजूर आणि दिव्यांग व्यक्तींच्या रास्त मागण्यांसाठी बुधवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा नेऊन ‘जेलभरो आंदोलन’ करण्याचा इशार सोमवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी दिला होता. बुधवारी या जेलभरो आंदोलनाची सुरूवात ही मुंबईपासून करण्यात आली. हे आंदोलन प्रहार जनशक्ती पार्टीचे संपर्क प्रमुख अॅड. अजय तापकीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कष्टकरी शेतकरी, विद्यार्थी आणि महिला कामगारांना त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी ‘जेलभरो आंदोलन’ करण्यात आले आहे. मुंबई जिल्हाधिकारी यांना आंदोलकांनी भेट घेऊन यासर्व मागण्यांचे निवेदन त्यांना दिले.

काय आहेत मागण्या?

  • शेतकऱ्यांना पीकविमा त्वरित मिळावा.
  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे.
  • महाराष्ट्रातील ओबीसीना घरकुल मिळाले पाहिजे. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह निर्माण केलं पाहिजे.
  • पेरणी ते कापणी पर्यंतची कामे मनरेगा अंतर्गत करण्यात यावी.
  • झोपडपट्टी धारकांना लवकरात लवकर हक्काचे घर देण्यात यावे. २० वर्षे एसआरए प्रोजेक्य रखडलेले आहेत.
  • विधवा आणि अनाथ निराधार महिलांना १०००० रुपये भाऊबीज भेट म्हणून देण्यात यावी.
  • प्रकल्प ग्रस्त लोकांना मोबदला आणि नोकरी त्वरित द्यावी.
  • गोपीनाथ मुंडे अपघात विमा शेतकरीमजूर आणि कामगारांना मिळालाच पाहिजे.
  • आदिवासीचे वनहक्क जमीनपट्टे त्वरित वितरित करावे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -