घरमहाराष्ट्रअनिल देशमुख सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वीच अडथळा; जयश्री पाटील यांनी दाखल केली कॅव्हेट

अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वीच अडथळा; जयश्री पाटील यांनी दाखल केली कॅव्हेट

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख गृहमंत्री असताना १०० कोटी गोळा करण्याचे टार्गेट देत असत, असा खळबळजनक आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली. यासोबतच Adv. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची शक्यता असल्यामुळे Adv. जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे.

Adv. जयश्री पाटील यांनी कॅव्हेट दाखल केल्यामुळे त्यांची बाजू मांडल्याशिवाय सर्वोच्च न्यायालय अनिल देशमुख यांच्या याचिकेवर निर्णय देऊ शकणार नाही. एखादं प्रकरण न्यायालयात येणार असेल तर तर दुसरा पक्षकार त्याची बाजू मांडण्यासाठी संधी मिळावी यासाठी न्यायालयाकडे विनंती करतो. त्याला कॅव्हेट म्हटलं जातं. एखाद्या प्रकरणाशी संबंधीत कॅव्हेट दाखल झाल्यानंतर ज्या पक्षकाराने कॅव्हेट दाखल केली आहे, त्याची बाजू मांडल्याशिवाय निर्णय देऊ शकत नाही. किंवा एखाद्या निर्णयाला स्थगिती देऊ शकत नाही. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालय निर्णय देतं.

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले. सीबीआयने १५ दिवसांत गृहमंत्र्यांवरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यास सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली आहे.

- Advertisement -

सीबीआयची टीम आजपासून तपासाला सुरूवात करणार आहे. सर्वात आधी सीबीआय परमबीर सिंह यांचा जबाब घेणार असल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर मुंबई पोलीसचे उपायुक्त राजू भुजबळ आणि त्यांच्या सोबतच एसीपी पाटील यांनाही चौकशीसाठी बोलवलं जाईल. या अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालंडे यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा अशी जवळपास तासभर खलबतं केली. यावेळी राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टातले वकील राहुल चिटणीस आणि इतर जवळपास पाच ते सहा वकिलांची फौजही सिंघवी यांच्या ‘अनीतायन’ या निवासस्थानी हजर होती.

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -