घरताज्या घडामोडीकोल्हापूर : जयसिंगपूर पोलीस ठाण्यातच चोरट्यांचा डल्ला

कोल्हापूर : जयसिंगपूर पोलीस ठाण्यातच चोरट्यांचा डल्ला

Subscribe

कोल्हापूरमधील जयसिंगपूर पोलीस ठाण्यात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे.

एखादी चोरी झाल्यास त्यासंदर्भात तक्रार करण्यासाठी ती व्यक्ती पोलिसात जाऊन तक्रार देते आणि मग रंगतो तो चोर – पोलिसांचा खेळ. मात्र, चक्क पोलीस स्थानकातच चोर – पोलिसांचा खेळ रंगल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यावरच चोरांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरांनी पोलीस ठाण्यातील कपाट फोडून विविध गुन्ह्यांतील जप्त केलेले एक – दोन नव्हे तर तब्बल १८५ मोबईल चोरले आहे. याप्रकरणी काही संशयितांचा पोलीस तपास करीत आहेत. तसेच शहरातील सीसीटीव्ही फुटेज मिळतात का याचाही शोध घेत आहेत. मात्र, यामुळे पोलीस यंत्रणेची अब्रू वेशीवर टांगली असून यावरुन पोलीस देखील सुरक्षित राहिले नसल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूरमधील जयसिंगपूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. चक्क पोलीस ठाण्यात चोरी झाल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला या चोरीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, अखेर हे बिंग फुटले. याप्रकरणी जिल्हा पोलिसप्रमुखांनी घटनेचा गुन्हा नोंद करण्यास सांगितले आणि त्यानंतर श्वान पथक, ठसेतज्ज्ञांना शनिवारी पाचारण करण्यात आले.

- Advertisement -

अशी झाली चोरी

जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या कार्यालयाच्या ईशान्य कोपऱ्यात कारकून खोली आहे. या खोलीला दरवाजा असून आतील बाजूस लोखंडी ग्रील आहे. त्यामुळे चोरटा मागील उत्तर दिशेकडील बोळरस्त्यावरील भिंतीवरुन खाली उतरला असावा, असा अंदाज लावण्यात येत आहे. तसेच त्यांनी आत येऊन दरवाजा उचकटून तसेच ग्रीलचे कुलूप तोडून खोलीत प्रवेश करत कपाटातील तब्बल ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, या चोरीत फक्त मोबईलच चोरीला गेले की, अजून काही मुद्देमाल चोरीला गेला आहे याबाबत संशय निर्माण झाला आहे.


हेही वाचा – वाढदिवसाच्या पार्टीत डीजे ऑपरेटरवर अमानुष अत्याचार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -