घरमहाराष्ट्रजळगाव : उन्मेष पाटील 'इन' स्मिता वाघ 'आऊट'

जळगाव : उन्मेष पाटील ‘इन’ स्मिता वाघ ‘आऊट’

Subscribe

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द केली असून त्यांच्याजागी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा पक्षाकडून अर्जदेखील दाखल झाला होता. मात्र आज पुन्हा एकदा स्मिता वाघ यांचा पत्ता कट करुन चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

उमेदवारीमुळे पक्षात दोन गट

भाजपाचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापल्यापासून भाजपात मोठा वाद निर्माण झाला होता. पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, स्मिता पाटील यांना उमेदवारी देण्यावरुन पक्षात दोन गट पडले. मात्र आता त्यांचे देखील तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे भाजप पक्षात एकच गोंधळ उडाला आहे. ए.टी. पाटील यांच्यामुळे पक्षाला मोठा फटका बसण्याचा धोका लक्षात घेता स्मिता वाघ यांचे तिकीट बदलवून आमदार उन्मेष पाटील यांना देण्यासाठी दिल्ली येथे मोठ्या हालचाली झाल्याचे कळते. अगदी उन्मेष पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची देखील चर्चा रंगली असून लवकरच याची अधिकृत घोषणा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -