घरमहाराष्ट्रJalgaon : पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी राडा नंतर तुफान दगडफेक; परिसराला छावणीचं स्वरुप

Jalgaon : पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी राडा नंतर तुफान दगडफेक; परिसराला छावणीचं स्वरुप

Subscribe

जळगाव : जिल्ह्यात दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोन गटात सुरुवातीला हाणामारी झाली आणि त्यानंतर झालेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार ते पाच जण जखमी झाले आहेत. जळगावातील रावेर तालुक्यात ही घटना घडली आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. (Jalgaon Exchange of money first followed by stormy stone pelting The area looks like a camp)

हेही वाचा – Sanjay Raut : “शिवसेना फुटीच्या वेळीच कॉंग्रेसही फुटणार होती”, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील ऐनपूर गावात पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी वाद झाला. त्यानंतर वाद वाढत गेला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे गावात दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला आणि थोड्याच वेळात दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच भुसावळ, यावल, रावेर या ठिकाणावरून पोलीस कुमक तातडीने ऐनपुर गावी मागवण्यात आली. मात्र सुरु असलेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

हेही वाचा – BMC : प्रशांत सपकाळेंकडे अखेर उपआयुक्तपदाची सूत्रे, सहायक आयुक्तपदी अजितकुमार आंबी

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी यांच्यासह आरसीपी व दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. महेश्वर रेड्डी यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला सध्या पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. याशिवाय तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे व इतर महसूल अधिकारी गावात पोहचले असून त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -