Homeताज्या घडामोडीStone Pelting : जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या कुटुंबीयांच्या गाडीवर दगडफेक

Stone Pelting : जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या कुटुंबीयांच्या गाडीवर दगडफेक

Subscribe

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचे कुटुंबीय प्रवास करत असलेल्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात मंगळवार 31 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वाहन चालकाने गाडीचा हॉर्न वाजल्याने आणि गाडी टच झाल्याने हा वाद झाला.

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचे कुटुंबीय प्रवास करत असलेल्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात मंगळवार 31 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वाहन चालकाने गाडीचा हॉर्न वाजल्याने आणि गाडी टच झाल्याने हा वाद झाला. काही वेळाने या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राडा घातला. विशेष म्हणजे हा राडा इतका भयंकर होता की, त्यात 10 ते 12 दुकानं पेटवण्यात आली. परिणामी, पाळदी गावात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Jalgaon Paladhi Causing Arson And Stone Pelting on gulabrao patil driver honked horn)

नेमकं प्रकरण काय?

मंत्री गुलाबराव पाटील यांचे कुटुंबीय जळगावातील पाळधी गावातून कारने प्रवास करत होते. त्यावेळी रस्त्यात काही जण उभे असल्याने वाहन चालकाने हॉर्न वाजवला. त्यावेळी उपस्थित काही जणांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. यानंतर दोन गट आमने सामने आले आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेची मिळताच पोलीस पाळधी गावात दाखल झाले. तोपर्यंत जाळपोळ करणारे तरुण पळून गेले होते. पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला असून जाळपोळीला कारणीभूत असलेल्या तरुणांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे. सद्यस्थितीत जळगावच्या पाळधी मध्ये पूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या वाहनातून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून या ठिकाणच्या ग्रामस्थांना संचार बंदीबाबत सूचना देण्यात आली होती. पाळधी गावांमध्ये पहाटे सहा वाजेपर्यंत कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाळधी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी सात ते आठ संशयितांना अटक करण्यात आली.


हेही वाचा – Raj Thackeray : मराठी माणूस हा केवळ…, नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत ठाकरेंनी व्यक्त केली खंत