Homeमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रJalgaon Accident : जळगावात बसचा अपघात; 28 प्रवासी जखमी

Jalgaon Accident : जळगावात बसचा अपघात; 28 प्रवासी जखमी

Subscribe

जळगावात आज भीषण अपघात झाला असून सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामध्ये 28 प्रवासी जखमी झाले आहेत.

जळगाव : जळगावात आज भीषण अपघात झाला असून सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामध्ये 28 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगावमधील धरणगाव तालुक्यात दोन गावाजवळील स्मशानभूमीजवळ धावत्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस थेट समोरील इलेक्ट्रिक खांद्यावर धडकल्याने अपघात झाला आहे. या घटनेत बसमधील 28 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. (major accident was avoided in Jalgaon.)

हेही वाचा : Accident News : रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू कोणाचा? महिलांचा की पुरुषांचा?

- Advertisement -

जळगावातील लाडली या ठिकाणाहून ही बस निघून रेल मार्गावरून येत असताना दोनगाव गावाजवळील स्मशान भूमीजवळ अपघात घडला आहे. धरणगाव तालुक्यातील लाडलीतून ही बस नेहमीप्रमाणे आज शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. त्याच दरम्यान रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे जात असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दोन गावाजवळील स्मशानभूमीच्या वळणाजवळ येताच भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील यांचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावरील जवळील इलेक्ट्रिक खांब्याला ही बस धडकली असून अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बस थेट नाल्यात गेली आहे. मात्र सुदैवाने इलेक्ट्रिक खांब्याला धडकल्याने पुढील दुर्घटना टळली आहे. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत.

हेही वाचा : Maharashtra Cabinet Expansion : शिंदेंच्या संभाव्य 12 मंत्र्यांची यादी समोर, बड्या नेत्यांना डच्चू; नव्या चेहऱ्यांना संधी

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी जखमींना तातडीने बसमधून उतरवत जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच काही वेळेतच बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली आहे. (major accident was avoided in Jalgaon.)


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -