बुलढाणा : जालन्यातील अंतरावली सराटी मराठा आंदोलकांवर (Jalna Lathi Charge) शुक्रवारी (1 सप्टेंबर) पोलिसांनी लाठीचार्ज केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी याठिकाणी आंदोलक चार दिवसांपासून उपोषण करत होते. पण त्याचवेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाज आक्रमक झाला. आता या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांत आंदोलनं करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या जालन्यातील दुर्दैवी घटनेनंतर विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहेत. ज्यांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते लोक गळा काढायला आले होते, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला आहे. ते आज बुलढाणा जिल्ह्यात शासना आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. (Jalna Lathi Charge Those who strangled the Maratha community Chief Minister attacked the opposition)
हेही वाचा – आम्ही मराठा आंदोलकांसोबत, पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले; विरोधकांनी राजकारण करु नये – मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे म्हणाले की, जालनामध्ये परवा दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे मला दु:ख झालं आहे, आपल्या सगळ्यांना दु:ख होणं स्वाभाविक आहे. परंतु त्याची कारणमीमांसा शोधण्याच्या ऐवजी याठिकाणी काही लोकं येऊन गेले त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली आहे. ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते लोकं तिथे गळा काढायला आले होते. मग अशोक चव्हाण असतील, माजी मुख्यमंत्री असतील नाहीतर आणखी कोणी असेल. मला या विषयावर आपल्याला एवढंच सांगायचं आहे, आपल्या सरकारने 2014-2017 मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. 12 टक्के, 13 टक्के आरक्षण उच्च न्यायालयात टीकलं, पण दुर्दैवाने ते सर्वाेच्च न्यायालयात गेलं. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्याठिकाणी आरक्षण रद्द झालं.
मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांवर हल्लाबोल
अशोक चव्हाण काल जालना येथे आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी सत्ताधारी पक्षावर आरोप केले. याचपार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, अशोक चव्हाण उपसमितीचे अध्यक्ष होता. काय केलं तुम्ही? काय केलं मराठा आरक्षणासाठी? तुमच्या हातात ते होतं. परंतु एकदातरी तुम्ही त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला का? मराठा समाजाचे लाखा लाखांत मोर्चा निघायचे. काहीही बोलायचं नाही, कुणालाही आपल्या मोर्चामुळे त्रास होऊ नये, कुणालाही गैरसोय होऊ नये, अशा प्रकारे मराठा समाजाचे अठ्ठावन्न लाखा लाखांचे मोर्चे निघाले. परंतु तेव्हा माजी मुख्यमंत्री मोर्चाला मूक मोर्चा म्हणाले. त्यांनी महिला भगिनींचा अपमान केला. हे सर्व जनता विसरणार नाही. माता-भगिनी, बांधव विसरणार नाहीत.
मराठा समाज संयमी
जालनातील घटनेनंतर जे आज राजकारण करत आहेत, त्यांना मी एकच सांगतो की, मराठा समाज फार संयमी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी सांगितले की, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार असं मराठा समाज कधीही ते काम करणार नाहीत. जालन्यात शांततेत सुरू असलेल्या आंदोलनामधून दगडफेक कुणी केली? हे देखील बघायला लागेल. या आंदोलनाच्या पाठून कोणी राजकीय पुढारी, समाजकंटक याठिकाणी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत का? याची देखील माहिती माझ्याकडे येईल. सर्वसामान्य भोळ्या भाबड्या मराठा समाजाच्या आरक्षणावर राजकीय पोळी भाजण्याचं काम कोणीही करू नका. मराठा समाज संयमी आहे. इमानदार आहे, विश्वासू आहे, प्रामाणिक आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
- Advertisement -
- Advertisement -