जालना: मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्याच्या गृहमंत्रावयाने तातडीने पावलं उचलायला सुरूवात केली असून शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश बलकवडे यांनीही जिल्ह्याच्या पोलूस अधीक्षकपदाची सुत्रं स्वीकारली आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Jalna Lathichrge on Maratha Morcha Shailesh Balkawade has been appointed as the superintendent of police of Jalna district)
शैलेश बलकवडे हे अत्यंत कडक शिस्तीचे IPS अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी याआधी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. नक्षलवाद्यांना जेरबंद करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. तसेच, त्यांच्या पत्नी कादंबरी बलकवडे या IAS अधिकारी आहेत.
जालना लाठीचार्जप्रकरणी कारवाई
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्य सरकारने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुषार दोषी यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि शैलेश बलकवडे यांची जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश बलकवडे यांनी देखील तातडीनं हा पदभार स्वीकारला आहे. जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा आढावा आता नवीन SP शैलेश बलकवडे घेत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
सर्वसामान्य मराठा शेतकऱ्यांच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. मला समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये. आंदोलनाच्या आगीवर स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजू पाहणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
(हेही वाचा: ‘राष्ट्रवादी’ला मुख्यमंत्री पद देण्याची वेळ आली तर उद्धव ठाकरे… प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट )