Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हीसुद्धा स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हीसुद्धा स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. तसंच, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासनही दिलं आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हीसुद्धा स्वस्थ बसणार नाहीत.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 16 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. आज त्यांच्या आंदोलनाचा 17 वा दिवस होता. सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं म्हणून दोनदा जीआरही काढला होता. तरीदेखील आरक्षणाचा प्रश्न सुटला नव्हता. आता अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जात जरांगे पाटलांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. तसंच, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासनही दिलं आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हीसुद्धा स्वस्थ बसणार नाहीत. (Jalna Maratha Reservation We too will not rest without reservation for the Maratha community Testimony of Chief Minister eknath Shinde to Manoj Jarange Patil)

मुख्यमंत्री म्हणाले की, मी बाबाला मघाशी सांगितलं की तुमचं पोरंग भारी आहे. स्वत:साठी नाही समाजासाठी लढत आहे. मनोजला मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत आहे. त्यानं वैयक्तिक फायद्यासाठी कोणताही प्रश्न मांडला नाही. जेव्हा भेटला तेव्हा मराठा आरक्षणाबद्दलच आग्रही भूमिका मांडली. मी मनोजला मनापासून शुभेच्छा देतो. त्याचं मनापासून अभिनंदनही करतो.

मुख्यमंत्र्यांकडून जरांगेंचं कौतुक

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, एखादं आंदोलन करणं आणि आमरण उपोषण करणं आणि ते जिद्दीनं पुढे नेणं, त्याला या महाराष्ट्रात जनतेचा प्रतिसाद मिळणं या सर्व गोष्टी कमीवेळा पाहायला मिळतात. पण त्याचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असला की सगळी जनता तुमच्या मागे उभी राहते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

ओबीसांसारखेच फायदे मिळावे

ओबीसांना जे फायदे मिळत आहेत. ते समाजाला देत आहोत. काही त्रुटी आहेत, त्या दूर करत आहोत. जे आरक्षम दिलं गेलं ते आरक्षण मिळवून देण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

तुमचा माणूस द्या

- Advertisement -

ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असतील, काहींकडे नसतील त्यांना न्याय देण्यासाठी जस्टीस शिंदे यांची समिती स्थापन केली आहे. त्यांचं काम सुरू झालं आहे. एक बैठक झाली आहे. दुसरी सुरू आहे. मराठा समाज कसा आहे, त्याचं राहणीमान कसं आहे ते तपासलं जात आहे. तुमचा माणूस सोबत दिला तर फायदाच होईल. तुम्ही वेळ दिला आहे ती चांगली गोष्ट आहे, असं म्हणत वेळेत काम करू असं शिंदे म्हणाले.

(हेही वाचा: शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर आजपासून सुनावणी सुरू; ‘अशी’ आहे ठाकरे गटाची रणनीती, जाणून घ्या सविस्तर )

जीव गेला तर आरक्षणाचा लढा सुरू ठेवणार- जरांगे पाटील

जरांगे पाटील म्हणाले की, समाजाच्या हिताचा निर्णय घेईल असे नेहमी सांगितले होते. प्रत्येक बैठकीत मुख्यमंत्री तुमचा विषय काढला. मराठा समाजाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत. शिंदे हे मराठ्यांना न्याय मिळून देणार आहे. तर जीवाची राख रांगोळी झाली तरी मराठा समाजासोबत गद्दारी करणार नाही. तुमच्या राजकारणात आमच्या मुलाबाळांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका, माझा जीव गेला तर मी आरक्षणाचा लढा सुरू ठेवेन. चिठ्ठ्या फिट्ट्याचे कारण सांगू नका, आम्ही तसे करणार नाही. मी एक इंचही मागे हटलो नाही आणि हटणारही नाही. मुख्यमंत्र्यांना आणेल असे म्हटले होते ते आणले. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही त्यांच्या मागेच लागेन असं मनोज जरांगे पाटील म्हटलं आहे.

 

- Advertisment -